Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकAaditya Thackeray : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; नाशिकच्या एका बिल्डरच्या Video...

Aaditya Thackeray : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; नाशिकच्या एका बिल्डरच्या Video चा दिला दाखला

भाजपवर केले गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणार्‍या सिंहस्थ मेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील (Tapovan) प्रस्तावित साधूग्रामसाठी (Sadhugram) १८०० झाडे तोडली जाणार आहेत. ही झाडे तोडण्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना, पर्यावरणप्रेमी, सिने अभिनेते शिवसेना (उबाठा) मनसे, राष्ट्रवादी (अजित पवार) शिवसेना (शिंदे गट) यांनी तीव्र विरोध केला आहे. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाशिकमधील बिल्डरच्या एका व्हिडीओचे उदाहरण देत तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करून भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) पोस्टमध्ये म्हटले की, ” तपोवन… आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे. तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की, साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये… म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल. तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आहे? नाशिकवर खरंच प्रेम आहे का? त्यांच्या सोशल मिडियावर होता आणि त्याच्या बाजूला बसले होते ते नाशिक भाजपचे खजीनदार. हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

YouTube video player

तसेच ” नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) जर ह्यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. धर्माचा पडदा आहे. ७०० झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे. साधुग्राम आम्हाला हवं आहे. तपोवन आम्हाला हवं आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे आता हा बिल्डर नेमका कोण आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे.

प्रदर्शन केंद्र किंवा व्यावसायिक काम होणार नाही – महाजन

तपोवनात प्रदर्शन केंद्राची निविदा निघाली होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली करण्यात आली होती. त्यावर स्पष्टीकरण देतांना मंत्री महाजन म्हणाले, “तपोवनात प्रदर्शन केंद्राची निविदा कशी निघाली माहिती नाही. परंतु, एकही झाड तोडून या ठिकाणी प्रदर्शन केंद्र किंवा व्यावसायिक काम होणार नाही. नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (निमा) ही जागा कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्रासाठी मागितली होती. परंतु, आम्ही तो प्रस्तावही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...