Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकNashik News : अजित पवारांचा अस्थिकलश आज जिल्ह्यात; नाशकात सर्व पक्षीय शोकसभा

Nashik News : अजित पवारांचा अस्थिकलश आज जिल्ह्यात; नाशकात सर्व पक्षीय शोकसभा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उप मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी (दि.२) येवला व नाशिक येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सोबत घेऊन येणार आहे. हा अस्थिकलश येवला व नाशिक येथील शोकसभेच्या स्थळी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी येवला शहरातील माऊली लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस स्व.अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

YouTube video player

दरम्यान, या शोकसभेस प्रमुख मंत्री, खासदार, आमदार व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेत स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व सर्व नागरिकांनी या शोकसभेस (Mourning) उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...