Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : ४०५ ग्रामपंचायतींच्या सत्तेची दोरी महिलांच्या हाती

Nashik News : ४०५ ग्रामपंचायतींच्या सत्तेची दोरी महिलांच्या हाती

जिल्ह्यात सरपंचपदाची सोडत जाहीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayats) सरपंचपदाची (Sarpanch Posts) सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये ४०५ जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता निम्म्या ग्रामपंचायतींच्या सत्तेची दोरी महिलांच्या हाती राहणार आहे.

- Advertisement -

राज्यातील २४,८८५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षण (Reservation ) सोडतीची सूचना ग्रामविकास विभागाने नुकतीच जाहीर केली. यात विविध प्रवर्गासह महिला आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, आता जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ यादरम्यान मुदत संपणाऱ्या राज्यातील १६७३ ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) २०२ ग्रामपंचायतींच्या प्रभागांची रचना होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यात आता राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाची सोडत राज्य शासनाने आहे त्यात नाशिक जिल्ह्यातील ८०९ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार ४०५ पदे महिलांसाठी (Women) राखीव ठेवण्यात आली आहेत.

संवर्गानुसार सरपंच आरक्षण

अनु. जाती ५४ (२७ महिला)
अनु. जमाती : १०७ (५४ महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग २१८ (१०९ महिला)
सर्वसाधारण : ४३० (२१५ महिला)

प्रभागरचना कार्यक्रम

१२ मार्च-प्रारूप प्रभागरवनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेणे.
१९ मार्च- प्रभागरचनेवर हरकती व सूचनांसाठी अंतिम मुदत.
२१ मार्च-उपविभागीय अधिकारी हरकतींवर अभिप्राय नोंदवतील.
२४ मार्च-जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...