Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik News : अंजनगिरी तीर्थावर युगल मुनिराजांचे आगमन; यात्रिनिवासाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Nashik News : अंजनगिरी तीर्थावर युगल मुनिराजांचे आगमन; यात्रिनिवासाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

नाशिक | Nashik

परमपूज्य आचार्यश्री देवनंदीजी गुरुदेव यांचे परम शिष्य, धर्मदिवाकर, जिनशासनप्रभावक युगल मुनिराज अमोघकीर्तीजी व अमरकीर्तीजी गुरुदेव यांचे अंजनगिरी तीर्थावर (Anjangiri Tirtha) (दि.११ डिसेंबर २०२५) रोजी मंगल आगमन झाले. त्यानंतर (दि. १२ डिसेंबर २०२५) रोजी गुरुदेवांच्या मंगल आशीर्वाद व पावन उपस्थितीत यात्रिनिवासाच्या भूमिपूजनाचा सोहळा वाणीभूषण पंडित प्रदीप मधुरजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाला.

- Advertisement -

या पावन प्रसंगी अंजनगिरी पर्वत वंदनाही करण्यात आली. भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने गणमान्य श्रावक-श्राविकांची उपस्थिती होती. यावेळी जयचंदजी पाटणी, सतीषचंद्रजी जैन, अशोकजी पाटणी, रविंद्रजी पाटील, सुमेरजी काला, सुनीलजी कासलीवाल, स्वरूपजी पहाडे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी मनोजजी गंगवाल, अंतिमजी लोहाडे व अजितजी दगडे उपस्थित होते.

YouTube video player

दरम्यान, या प्रसंगी गुरुदेवांच्या प्रवचन व आशीर्वचनांमुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला होता अशी माहिती दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनगिरी ट्रस्टचे अध्यक्ष पवन पाटणी यांनी दिली.

ताज्या बातम्या