Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik News : बागलाण, मालेगाव बाह्य, इगतपुरीत लागणार दोन मतदान यंत्रे

Nashik News : बागलाण, मालेगाव बाह्य, इगतपुरीत लागणार दोन मतदान यंत्रे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उमेदवारी अर्ज माघारीनंतर विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरी या तीन मतदारसंघात (Constituencies) प्रत्येकी दोन बॅलेट युनिट लागणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे, उर्वरित १२ मतदारसंघात १५ पेक्षा कमी उमेदवार असल्याने त्या ठिकाणी एकच बॅलेट युनिट लागणार असल्याने त्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

जिल्ह्यात (District) एकूण ४ हजार ९२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदान यंत्राची व्यवस्था केली जाते. एका बॅलेट युनिटवर १५ व एक नोटा असे १६ नावांचा समावेश करता येऊ शकतो. जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा मतदारसंघात १० हजार ८८२ बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. तर ६२४७ कंट्रोल युनिट व ६७३९ व्हीव्हीपॅटची व्यवस्थाकरण्यात आली आहे.

हे देखील वाचा :  Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

निवडणूक विभागाने (Election Department) मंगळवारी पुरवणी सरमिसळ करुन घेत मतदान यंत्रांची चाचणी करुन घेतली. त्यामुळे येत्या २० तारखेला मतदानासाठी त्यांचा वापर करणे शक्य होईल. मतदान व मतमोजणी यासाठी २७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार – कडलग

मतटक्का वाढवण्यासाठी प्रयत्न

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६२.६० टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा जास्त मतदार मतदान कसे करतील, यादृष्टीने निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. विविध क्लिपच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात एकूण ६० हजार २७८ वयोवद्ध उमेदवार तर, २५ हजार २८७ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना घरुनच मतदान करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.

हे देखील वाचा : गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

जिल्ह्यात २६ लाख पुरुष २४ लाख महिला मतदार

जिल्ह्यात १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत ५० लाख ६१ हजार १८५ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात २६ लाख १४ हजार ९६ पुरुष मतदार आणि २४ लाख ४६ हजार ९६८ महिला मतदार आहेत.१२१ तृतियपंथी मतदार असून, ८,७९६ सैनिक मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावू शकतात.

हे देखील वाचा : Nashik Political : मांजरपाड्याच्या पाण्याने नांदगाव तालुका समृद्ध करणार; मांडवड, भालूर प्रचारदौऱ्यात समीर भुजबळ यांची ग्वाही

मतदारसंघनिहाय मतदान केंद्र

नांदगाव ३४१
मालेगाव मध्य ३४४
मालेगाव बाह्य ३५२
बागलाण २८८
कळवण ३४८
चांदवड ३०६
येवला ३२८
सिन्नर ३३८
निफाड २७८
दिंडोरी ३७३
नाशिक पूर्व ३३१
नाशिक मध्य ३०३
नाशिक पश्चिम ४१३
इगतपुरी ३००
देवळाली २७९

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या