Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकगुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

दिव्यांग बांधवांची लक्षणीय उपस्थिती; युवकांचा वाढता कल

- Advertisement -

निफाड । प्रतिनिधी Niphad

निफाड विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच स्वराज्य पक्ष सर्व अंगीकृत शेतकरी संघटनेच्या परिवर्तन महाआघाडीचे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज नांदुर्डी येथील प्रसिद्ध वरदविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात झाला. यावेळी हजारो समर्थक आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रचार सभेप्रसंगी अर्जुन तात्या बोराडे, पांडुरंग पगारे, विलासराव अंढागळे, साहेबराव गायकवाड हरिभाऊ कुशारे आदींची भाषणे झाली. सत्ताधारी पक्षाचे ध्येयधोरण व विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या कार्यपद्धतीची सर्वच वक्त्यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुदेव कांदे तिसरा सक्षम पर्याय कसे योग्य आहेत ते नागरिकांना पटवून दिले.

निफाड तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्नांना हात घालून आजी-माजी आमदार जनतेची दिशाभूल करून मते मागत आहेत. परंतु आपण जनतेचा जनसेवक म्हणून पुढील पाच वर्षासाठी आमदारकी पणाला लावू. निसाका, रासाका, प्रस्तावित उड्डाणपुल, जिल्हा बँक, असंघटित कामगार, लासलगाव बाजार समिती असो वा पिंपळगाव बाजार समिती; येथे स्थानिकांना रोजगार कसा मिळेल तसेच नांदूर मधमेश्वर धरण अभयारण्य पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा बँकेच्या अवाजवी वसुलीबाबत व शेतकर्‍यांच्या जमिनीवर नाव लावणार्‍या या बँकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे गुरुदेव कांदे यांनी सांगितले.

तत्कालीन संचालकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यांच्याविरोधात बँक प्रशासन का कारवाई करीत नाही याबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहे. तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत कशी निर्माण करता येईल, शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी मुंबई आणि दिल्ली दरबारी जीवाचे रान करून, असे कांदे यांनी सांगितले. विद्यमान आमदारांनी रासाका भाडेपट्ट्यावर पंधरा वर्षे चालवण्यासाठी घेतला आहे. परंतु दोन गळीत हंगाम पूर्ण करून चालू हंगाम त्यांनी बंद ठेवला आहे. मागील दोन वर्षे ऊस उत्पादकांनी रासाकाला ऊस पुरवला.

आता त्यांनी कोणत्या तोंडाने बाहेरील कारखान्यांना ऊस द्यायचा? त्यामुळे फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी कारखाना सुरू केला. परंतु आता तो बंद ठेवून तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक, कामगार व जनतेची फसवणूक करणार्‍या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल कांदे त्यांनी उपस्थित केला. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी तसेच ऊस उत्पादकांनी गुरुदेव कांदे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन तात्या बोराडे, रिपब्लिकन काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पगारे,प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, प्रहार जनशक्ती राज्य समन्वयक संध्याताई जाधव, प्रहार जनशक्ती नाशिक जिल्हाध्यक्ष शरदराव शिंदे, अनिल भडांगे, रिपब्लिकन काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विलासराव अढांगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, प्रहार जनशक्ती युवा आघाडी प्रमुख जगन काकडे, प्रहार नाशिक शहराध्यक्ष श्यामभाऊ गोसावी,

उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, प्रहार उपजिल्हा अध्यक्ष सागर निकाळे, स्वराज्य पक्ष निफाड तालुका अध्यक्ष अशोकराव आहेर, स्वाभिमानी शेतकरी निफाड तालुका अध्यक्ष संजय पाटोळे, एकलव्य आदिवासी संघटना राजू धोत्रे, खेडे माजी सरपंच साहेबराव गायकवाड, नांदूरखुर्द सोसायटी माजी सभापती हरिभाऊ कुशारे, उद्योजक राहुल ढोमसे, प्रहार दिव्यांग संघटनेचे ललित पवार, सोमनाथ धुमाळ, अरुण जाधव, संतोष पांडव, किरण आहेर ,दत्ता आरोटे, मंगेश औताडे, जयेश जगताप, ,ज्ञानेश्वर पठारे आदींच हजारो समर्थक व परिवर्तन महाआघाडी कार्यकर्ते, गुरुदेव कांदे मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या