Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिककरांचे असेही प्रेम; प्रजासत्ताकदिनी बहुचर्चित वडाला लावली तिरंगी रोषणाई

नाशिककरांचे असेही प्रेम; प्रजासत्ताकदिनी बहुचर्चित वडाला लावली तिरंगी रोषणाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील गेल्या काही काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वडाच्या झाडाला आज सायंकाळी तिरंगी विद्युत रोषणाई केलेली दिसून आली. पर्यावरण प्रेमींनी कत्तल होण्यापासून वाचवलेल्या या वटवृक्षाला भारतीय राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांनी लायटिंग साकारल्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला आहे….

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेने सिटी सेंटर मॉलच्या नजीक असेलेले हे वडाचे झाड जमीनदोस्त करून येथून त्रिमूर्ती चौकापर्यंतचा उड्डाणपूल करण्यासाठीचा हिरवा कंदील दिला होता.

यानंतर मात्र नाशिककर हे जुने झाड तोडू नये यासाठी मानवी साखळी केली होती. तसेच याठिकाणी आरतीदेखील करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील पर्यावरणप्रेमींच्या विरोधाची अखेर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत उड्डाणपुलाचा पर्यायी आराखडा तयार करण्याबाबत महापलिका आयुक्तांना सुचवले आहे.

यामुळे या झाडाची कत्तल सध्यातरी थांबलेली आहे. येथील मंदिरात काल सायंकाळी काहि कार्यकर्त्यांनी आरती केली होती.

दरम्यान, आज नाशिककरांच्या अनोख्या प्रेमाचे दर्शन याठिकाणी पुन्हा एकदा झाले आहे. या झाड्याच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशप्रेम दाखविण्यासाठी याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले असून नाशिककरांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून सोशल मीडियात हे फोटो मोठया प्रमाणात व्हायरल झालेले बघायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या