Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : अखेर पाच महिन्यांनी बिऱ्हाड आंदोलन मागे

Nashik News : अखेर पाच महिन्यांनी बिऱ्हाड आंदोलन मागे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या ५ महिन्यांपासून आदिवासी विकास विभागासमोर (Tribal Development Department) सुरू असलेले रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रविवारी (दि.७) अखेर समाप्त झाले. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासमेवत शनिवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चेतून डॉ. उईके यांनी वर्ग ४ आणि वर्ग ३ च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना बाह्यस्त्रोत्राद्वारे भरती करण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांचे झाले. रविवारी दुपारी साडेबाराला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे समाधान घेतल्यामुळे गडकरी चौकापर्यंत रस्त्यानेही त्र्यंबकनाका ते गडकरी चौकापर्यंत रस्त्यानेही मोकळा श्वास घेतला.

- Advertisement -

रोजंदारी शासकीय आदेश (Government Order) कर्मचाऱ्यांना मिळावेत, यासाठी गेल्या ९ जुलैपासून आदिवासी आश्रमशाळेचे रोजंदारी शिक्षकांनी आदिवासी विकास विभागासमोर ठाण मांडले होते. शासन आणि आंदोलकांमध्ये अनेकवेळा झालेल्या चर्चेच्या फ ऱ्या निष्फळ ठरल्या. त्यानंतरही आंदोलकांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला. दरम्यान १० वर्षे पूर्ण केलेल्या आंदोलनकर्त्यांना शासनाने कायमस्वरूपी नोकरीवर नियुक्त्याही दिल्या. शासनाने सुरू केलेली बाह्यस्त्रोत भरती आंदोलनकर्त्यांना मान्य नसल्याने आंदोलन सुरूच होते.

YouTube video player

अखेर २० नोव्हेंबर रोजी बाह्यस्त्रोत भरती आंदोलनकर्त्यांनी (Agitators) मान्य केली. शासनाला पत्रही देण्यात आले होते. मात्र तरी-ही समस्या कायम होती. अखेर शनिवारी (दि.६) आदिवासीमंत्री आणि आंदोलनकर्त्यादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यावेळी मंत्रीमहोदयांनी वर्ग ४ चा प्रश्न सोडवून वर्ग ३ च्या रोजंदारी शिक्षकांना बाह्यस्त्रोत भरतीद्वारे नोकरी देण्याचे कबुल केले. याशिवाय ५० शिक्षकांना राज्यस्तरीय कामकाजासाठी नेमणूक देण्याचेही आश्वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

रस्त्याने घेतला मोकळा श्वास

त्र्यंबक नाका ते गडकरी चौक या रस्त्यावर आंदोलनकत्यौनी चूल मांडल्याने रस्ता बंद होता. आंदोलनकर्त्यांसह पोलिसांचे पथकही आदिवासी विकास विभागात ठाण मांडून होते. रविवारी आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेडसही हटविले. यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

उद्या बैठक

रोजंदारी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे आदिवासी मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे.

आंदोलकर्त्यांची दिलगिरी

नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. आंदोलनामुळे वाहतूक कोंडीही होत होती. आमच्यामुळे नाशिककरांना जो काही त्रास झाला असेल, त्यासाठी आम्ही नाशिककरांची माफी मागतो अन् सहकार्याबद्दल आभारही असे संघटनेचे अध्यक्ष ललितकुमार चौधरी यांनी म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांत या आंदोलकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार, रोहित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार, खा. भास्कर भगरे, मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, राजू देसले आदींसह अनेकांनी भेटून सहानुभूती व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘स्कार्फ’मुळे पडल्या बेड्या! बसस्थानकातून दागिने लंपास करणाऱ्या महिलेस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik चेहऱ्यावर स्कार्फ, गर्दीत सफाईदार हालचाली आणि दोन मिनिटांत बदललेला वेश ठक्कर बझार बसस्थानकावरील गर्दीतून महिलेचे (Woman) लाखो रुपयांचे दागिने (Jewelry)...