Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik News : पिंपळगांव बसवंतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मोरे बिनविरोध

Nashik News : पिंपळगांव बसवंतच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मोरे बिनविरोध

पिंपळगांव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant  

पिंपळगांव बसवंत नगरपरिषदेच्या (Pimpalgaon Baswant) उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे सतीश साहेबराव मोरे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा (Mahayuti) चेहरा असलेले मोरे यांना सर्वाधिक दहा नगरसेवक असलेल्या शिवसेनेने संधी दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित राहून उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांना शुभेच्छा देत खिलाडुवृत्ती दाखविली.

- Advertisement -

पिंपळगांव बसवंत नगरपरिषदेची निवडणुक नुकतीच झाली. त्यात भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.मनोज बर्डे मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते. यासह १८ जागा भाजप-शिवसेना महायुतीच्या निवडुन आल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सात जागावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आज (सोमवारी) नगरपरिषद भवनात उपनगराध्यपदाची निवड प्रक्रिया पार पडली.

YouTube video player

निवडणूक निर्णय अधिकारी नगराध्यक्ष डॉ.मनोज बर्डे, मुख्याधिकारी डॉ.श्रिया देवचक्के यांच्याकडे उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाचे गटनेते सतीश मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका रेखा लभडे तर अनुमोदक म्हणून गटनेते निलेश पाटील यांनी स्वाक्षरी केली. एकमेव अर्ज दाखल झाल्याने सतीश मोरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, मोरे यांच्या निवडीनंतर भाजपा-सेनेच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी भोंगा वाजवून व फटाक्याची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.नगरपरिषद भवनात झालेल्या निवडीप्रसंगी शिवसेनेचे युवानेते राजेश पाटील,निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, पिंमकोचे उपाध्यक्ष संदीप सुराणा, रविद्र मोरे,बापुसाहेब पाटील, सत्यजीत मोरे यासह युतीचे नगरसेवक निलेश पाटील,सुजित मोरे,छाया पाटील, कल्पना विधाते,ज्ञानेश्‍वर जोगारे,माणिक वाघ,श्‍वेता मोरे,सोनाली विधाते रेखा लभडे,इमरान कोतवाल,सिंधु गांगुर्डे,तौसिफ मन्सुरी,प्रशांत मोरे,सीमा कायस्थ,सुवर्णा वाघले,अनिता गांगुर्डे,मघना पानपाटील हे उपस्थित होते. 

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...