Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : विडी कामगार नगरमधून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचे...

Nashik News : विडी कामगार नगरमधून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले तलावात

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक शहरातील (Nashik City) आडगाव परिसरातील (Aadgaon Area) विडी कामगार नगर येथील बेपत्ता झालेल्या तीन लहान मुलांचे मृतदेह (Dead Body) तलावात (Lake) सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. साई गोरक्ष गरड (१४), साई केदारनाथ उगले (१३) आणि साहिल हिलाल जाधव (१४) असे तिन्ही मुलांची नावे आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (दि.२९) रोजी ही तिन्ही मुले बेपत्ता असल्याने त्यांचा नातेवाईकांकडून दुपारपासून शोध सुरू होता. मात्र ते कुठे आढळून आले नाही. अखेर आज सोमवार (दि ३०) रोजी सकाळी विडी कामगार नगर येथील पाटालगत असलेला एका खाजगी इमारत (Private Budling) बांधकामासाठी खोदलेला खड्ड्याच्या बाजूला या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्याने हे तिघेही याच खड्ड्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

YouTube video player

त्यानंतर या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस (Aadgaon Police) आणि नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) अग्निशामक दलांकडून तीनही मुलांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, पाटालगत एक खाजगी बांधकाम व्यावसायिकाने इमारत उभारणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खोदलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने ही तीनही मुले काल दुपारी आंघोळीच्या निमित्ताने इथे आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी (Water) साचले आहे. खाली गाळ असल्याने या गाळात पाय फसल्याने मुलांचा मृत्यू (Death) झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...