Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik News : आंदाेलकांना 'बिऱ्हाड' भाेवणार! बेकायदा जमाव जमविल्यासह अडवणूक केल्याचे ...

Nashik News : आंदाेलकांना ‘बिऱ्हाड’ भाेवणार! बेकायदा जमाव जमविल्यासह अडवणूक केल्याचे दाेन गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एजन्सीद्वारे नियुक्तीला विराेध व अन्य मागण्यांसाठी ९ जूनपासून गडकरी चाैकातील (Gadkari Chowk) आदिवासी विकास आयुक्तालयासमाेर आंदाेलन करणाऱ्या राेजंदारी कर्मचाऱ्यांच्या सहनशिलतेचा बांध अखेर ३५ दिवसांनंतर(दि. १२) फुटून त्यांनी थेट आयुक्तालयात (Commissionerate) शिरुन आंदाेलन करीत घाेषणाबाजी केली. त्यानंतरही या आंदाेलनाबाबत सुकर मार्ग निघाला नसताना आता आंदाेलकांवर वेगवेगळ्या स्वरुपाचे दाेन गंभीर गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत. त्यामुळे बिऱ्हाडातील राेजंदारी कर्मचाऱ्यांना हे आंदाेलन भाेवणार असल्याचे स्पष्ट हाेत आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजता आंदोलकांनी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या (Tribal Development Commissionerate) गेटसमोर घोषणाबाजी करुन आंदोलन केले. त्यानंतर, पोलीसांना न जुमानता गेटवरुन उड्या घेऊन आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसांचा नाईलाज झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आयुक्तालयातील प्रभारी अपर आयुक्त दिनकर जिऱ्या पावरा यांनी मुंबईनाका पाेलिसांत फिर्याद नाेंदविली आहे.

YouTube video player

त्यान्वये, संशयित आंदाेलक ललीतकुमार चौधरी, अमोल तायडे, रमेश अहिरे, चंद्रशेखर दळवी, अंकुश चव्हाण, प्रविण पुंड, नवनाथ खादे, प्रमिला भरसट, योगिता बाली पवार, तुळशीराम खोटरे, सचिन पवार आदींसह दीडशे आंदाेलकांनी ‘भारतीय आदिवासी पँथर संघटना’ व ‘महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटना, वर्ग तीन आणि चार’ चे नेते व इतर आंदोलनकांनी बेकादेशीर जमाव जमवून विनावपरवानगी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रांगणात प्रवेश केला. तसेच शासन, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन अधिकारी, अंमलदार व अभ्यांगतांना आत येण्यासह जाण्याचा मार्ग अडवून धरला, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक शेख करत आहेत.

पाेलिसांची स्वतंत्र फिर्याद

शहर पाेलीस (City Police) आंदाेलनस्थळी बंदाेबस्तावर असताना, वरील संशयितांसह दीडशे आंदाेलकांनी घोषणाबाजी करुन अचानक बॅरिकेटस् ढकलून दिले. यानंतर, आयुक्तालयाच्या गेटमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत करुन पाेलिसांनी त्यांना समजावून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी अधिक आक्रमक हाेऊन प्रतिकार केला व गेट ढकलून भवनाच्या प्रांगणात प्रवेश मिळविला. त्यानंतर, घोषणाबाजी करुन आंदोलन केले व पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले, अशी फिर्याद हवालदार संताेष चित्ते यांनी दिली आहे. तपास उपनिरीक्षक दत्ता गाेडे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...