Friday, May 17, 2024
Homeनाशिकसीबीएस ते मेहेर सिग्नल वाहतूक बंद; कारमधील सीएनजी लिकेजमुळे झाली कोंडी

सीबीएस ते मेहेर सिग्नल वाहतूक बंद; कारमधील सीएनजी लिकेजमुळे झाली कोंडी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडवर रणरणत्या उन्हात वाहतूक कोंडी झाली आहे. एका गुजरात पासिंगच्या वाहनातून सीएनजी लिकेज होत आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा सीबीएस सिग्नलपर्यंत लागलेल्या आहेत.

- Advertisement -

घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून सीबीएसकडून अशोक स्तंभाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे जवान पोहोचत आहेत. नागरिकांनी गर्दी न करता सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सीबीएस परिसरातील सिग्नलवर पोलीस गाडी आडवी करून पोलिसांनी रस्ता बंद केला असून या परिसरात जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सिन्नरमध्ये दोन वाहनांमधून गस लिकेज झाल्यामुळे एका घटनेत चालकाचा होरपळून मृत्यू झाला होता.

तर दुसऱ्या घटनेत होंडा सिटी गाडी जळून खाक झाली होती. त्यामुळे शहराच्या वर्दळीच्या भागात आपत्ती ओढवू नयेत यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.या गाडीपासून वाहने दूर करण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या