Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik News : सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी संलग्न; २५० कॅमेरे सुरु, उर्वरितसाठी पाठपुरावा

Nashik News : सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी संलग्न; २५० कॅमेरे सुरु, उर्वरितसाठी पाठपुरावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत शहरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा (Camera) ‘फीड’ नियंत्रण कक्षात मिळत नसल्याने पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराची कानउघाडणी केल्यानंतर तातडीने कार्यवाही पूर्ण झाली आहे. आठशेपैकी अडीचशे कॅमेऱ्यांचा ‘फीड’ पोलिसांच्या नियंत्रण मिळत निम्मे कक्षात असून शहर आयुक्तालयाच्या ‘दृष्टी’त आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

आगामी सिंहस्थाच्या (Simhastha) दृष्टीने पोलिसांनी (Police) नियोजन सुरू केल्याने स्मार्ट सिटीकडे उर्वरित ‘फीड’साठीही पाठपुरावा सुरू झाला आहे. जून २०२३ मध्ये नियंत्रण कक्षात सिंहस्थाकरीता ‘कमांड कंट्रोल रूम’ कार्यान्वित केल्यापासून शहरातील सर्व सीसीटीव्हींचा ‘फीड’ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या रेंगाळलेल्या कामांचा फटका पोलीस प्रशासनालाही बसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी लोकसभा निवडणुकीतच स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या. त्यावेळी पंधरा दिवसांची मुदत उलटल्याने आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केल्याचे कळते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी अडीचशे कॅमेऱ्यांचा फीड आयुक्तालयात जोडला आहे. उर्वरित कॅमेऱ्यांचा फीड निवडणुकीपर्यंत मिळेल, अशी शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जाच असह्य झाल्याने गोळीबार; पोलीस तपासात संशयितांची माहिती

दरम्यान, या फीडमुळे गुन्हेगारी नियंत्रणासह शहरातील परिस्थितीवर नजर ठेवणे पोलिसांना शक्य होत आहे. तसेच एखादा ‘स्ट्रीट क्राईम’ घडल्यावर तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध होईल. यासह आगामी सिंहस्थात या कॅमेऱ्यांचा पोलिसांना विशेष फायदा होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीने फीड दिला असला तरी, कॅमे-यांद्वारे ई-चलान ठोठविण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. पोलिस (Police) सातत्याने त्यासाठी पाठपुरावा करीत असले, तरी तांत्रिक कारणे नोंदवून स्मार्ट सिटी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ई-चलान कित्येक वर्षांपासून रखडले आहे.

हे देखील वाचा : Narhari Zirwal : “जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले”; नरहरी झिरवाळांचा मोठा खुलासा

आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने ‘कमांड कंट्रोल सेंटर’ अद्ययावत होत आहे. उर्वरित सीसीटीव्हींचा ‘फीड’ व ई-चलान प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’कडे पाठपुरावा करत आहोत. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हींचा ‘फीड’ नियंत्रण कक्षात येत असल्याने शहरातील परिस्थितीसह वाहतुकीवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.

चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, मुख्यालय

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या