नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्र सरकारच्या (Central Government) भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ (NAFED and NCCF) या दोन संस्थांनी खरेदी केलेल्या कांद्यावर केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे. यासाठी कांदा साठवण केलेल्या केंद्रांवर सातत्याने भेट देऊन त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २९) कांदा खरेदीच्या स्थितीचा आढावा घेतला. फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा सहकारी संस्थांनी खरेदी केंद्रांना आणि साठवणूक केंद्रांना भेटी देण्यासाठी अनेक पथके नियुक्त केली आहेत. तपासणी पथकांचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी व योग्य साठवणूक सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलेल. सणांच्या हंगामात सप्टेंबरपासून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांदे (Onion) मिळतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार ‘नाफेड’चा कांदा बाजारात उतरविणार आहे. आव्हानांना अधिक सुलभ करण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी, अधिकाऱ्यांची (Officers) पथके सर्व ‘एफपीओ’ आणि ‘एफपीसीं’ना भेट देतील. जेणेकरून चांगल्या दर्जाचे कांदे हे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे खरेदी आणि साठविले जातील, याकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे.




