Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Traffic Route Change : सोमवारपर्यंत अनेक मार्गांत बदल; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

Nashik Traffic Route Change : सोमवारपर्यंत अनेक मार्गांत बदल; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

गणपती देखावे पाहण्यासाठी होणार गर्दी

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहरातील गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांनी यंदा विविध जनजागृतीपर देखावे आणि गणपतीच्या आरास पूर्ण केल्या आहेत. याच आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांची (Devotees) मोठी गर्दी होणार असल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी बुधवार ते सोमवार या सहा दिवसांकरिता सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत विविध वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हशी खरेदी करुन आणणाऱ्यांना जबर मारहाण; आठ जण अटकेत

याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) यांनी जारी केली आहे. बदल केलेल्या मार्गावर पर्यायी मार्ग सूचविण्यात आले असून वाहनचालक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने (Transport Department) केले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल

गणेशोत्सवात पाचव्या व सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यावेळी विसर्जन स्थळांवर गर्दी होत असल्याने तेथेही वाहतूक मार्गात बदल केले आहेत.त्यानुसार निमाणी बसस्थानकावरून (Nimani Bus Stand) पंचवटी कांरजा मालेगाव स्टॅन्ड रविवार कांरजा मार्गावर आणि सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस, सिटीलिंक बसेस व जड वाहनांना दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’करण्यात येणार आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून काट्यामारुती चौक, संतोष टी पॉईन्ट, कन्नमवारपूल, द्वारका सर्कल मार्गाने नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी जातील. तसेच सीबीएस वरून निघणारी वाहतूक अशोकस्तंभ, रामवाडीपूल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका, या मार्गावरुन निमाणी स्टॅन्डकडे जातील. बदल केलेल्या मार्गावरून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश राहणार आहे. तसेच स्थानिक रहिवाशांना या मार्गातील वाहतूक बदल लागू राहणार नाही.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

पर्यायी वाहतूक मार्ग

■ सारडा सर्कल गडकरी सिग्नल मोडक सिग्नल सीबीएस मेहेर सिग्नल अशोक स्तंभ रामवाडी मार्गे मालेगाव स्टँड-मखमलाबाद नाका पेठनाका दिंडोरी नाका मार्गे इतस्त्र जातील.
■ मालेगाव स्टँडपर्यंत येणारी वाहतूक मखमलाबाद नाका रामवाडी -जुना गंगापूर नाका मार्गे इतरत्र जातील.

वाहतूक मार्गात बदल व पर्यायी मार्ग असे

■ मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालीदास कलामंदिस्मार्गे सुमंगल कपडयाचे दुकान या मार्गावरील दुतर्फा वाहतूक सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नलमार्गे जाऊ शकेल.
■ सीबीएस बाजुकडून गायकवाडक्लास, कान्हेरेवाडी मार्गे किटकेंट,सुमंगल कपड्याचे दुकानाकडे व सुमंगल कपडयाचे दुकानाकडुन कालीदास मार्ग व किटकॅटकडुन सिबीएस बाजुकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद राहील.
■ पंचवटी विभागातील सरदारचौक ते श्री काळाराम मंदिर असा मार्ग दुतर्फा वाहतुकीस बंद राहणार आहे.
■ पंचवटीतील मालविय चौक ते गजानन चौक, नागचौक, शिवाजीचौक व शिवाजीचौक ते मालवियचौक असा दुतर्फा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

प्रवेश बंद मार्ग

■ सारडा सर्कल-खडकाळी सिग्नल शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग
■ खडकाळी सिग्नलकडून दिपसन्स कॉर्नर- नेहरु उद्यानकडून गाडगे महाराज पुतळामार्गे मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा मार्ग.
■ त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नर दुतर्फा मार्ग
■ गाडगे महाराज पुतळा धुमाळ पॉइंट मंगेश मिठाई कॉर्नर
■ मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल – धुमाळ पॉइंट – दहीपूल दुतर्फा मार्ग
■ सीबीएसहून शालिमार व नेहरु उद्यानाकडे जाणारा मार्ग
■ प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा मार्ग
■ अशोक स्तंभ – रविवार कारंजा मालेगाव स्टैंड दुतर्फा मार्ग
■ मालेगाव स्टैंड – रविवार कारंजा – शालिमार दुतर्फा मार्ग
■ मोडक सिग्नल – खडकाळी सिग्नल मार्गे कालिदास कलामंदिर मार्गे शालिमारकडे जाणारी दुतर्फा वाहतूक बंद

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या