Monday, October 14, 2024
Homeक्राईमNashik Crime News : म्हशी खरेदी करुन आणणाऱ्यांना जबर मारहाण; आठ जण...

Nashik Crime News : म्हशी खरेदी करुन आणणाऱ्यांना जबर मारहाण; आठ जण अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दुग्ध व्यवसायासाठी पेठ (Peth) येथून म्हशी (Buffalo) खरेदी करुन त्या दाेन मालवाहू वाहनांतून नाशिकमध्ये आणणाऱ्या तिघांना पेठराेड येथे १२ ते पंधरा गाैरक्षकांनी रस्ता अडवत जबर मारहाण करुन राडा घातला. या घटनेत संशयितांनी वाहनांवर दराेडा टाकून पशुमालकाचे दीड लाख रुपये लुटून नेल्याने खळबळ उडाली असून प्रकरणात म्हसरुळ पाेलिसांनी एका संघटनेच्या आठ जणांना अटक (Arrested) केली आहे. न्यायालयाने त्यांना येत्या १३ सप्टेंबरपर्यंत पाेलीस काेठडी ठाेठावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

कृष्णा गणेश मुंढे (वय १९, रा. मिलेनियम पार्क, शिवाजीनगर, म्हसरूळ), गणेश दिलीप कर्पे (वय ३१, रा. अथर्व रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद), जगदिश अमृत पाडवी (वय २४, रा. राे हाऊस नं ६, इंद्रप्रस्थनगर, पेठरोड), अभिमान धर्मेंद्र सानप(वय ४९, रा घर नंबर ३७८, घनकर लेन, रविवार पेठ), प्रसाद भाऊसाहेब भंडागे(वय २४, रा. भंडागे चाळ, क्रांतीनगर, पंचवटी), समाधान सचिन बिडकर(वय  २३, रा. विजय प्राईड, शांतीनगर, मखमलाबाद), जय जनार्दन देवरगावकर(वय २६, रा. ८, पंचशिल अर्पा. नवनाथनगर, पंचवटी), किरण सुखलाल केदार(वय २५  रा. रामवैभव अपार्टमेंट, क्रांतीनगर, पंचवटी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

वाजीद इस्माईल कुरेशी(वय ३५, रा. कथडा मस्जिदीजवळ, जुने नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार ते वाहनचालक असून (दि. ९) रात्री नऊ वाजता ते फहाद कुरैशी, अब्दुल हमीद शेख बशीर यांच्यासह अशोक लेलॅन्ड वाहन क्र एमएच ०२ सीई ७६२२ व पिकअप क्र एमएच १५ बीजे ७८६१ ने दुभत्या म्हशी पेठ येथून खरेदी करुन नाशिककडे परतत हाेते. ते म्हसरुळ पाेलिसांच्या हद्दीतील पेठराेडवरील साईराम हॉस्पिटलसमोरुन जात असतांना, वरील संशयितांसह अन्य चार ते पाच संशयित दुचाकी व कारमधून आले. त्यांनी वाजीद यांच्या दाेन्ही मालवाहू वाहनांचा पाठलाग करुन गाड्या (Cars)रस्त्यात अडविल्या.

हे देखील वाचा : Ajit Pawar : “दादा तुमचं वागणं बदललंय की भावनिक कार्ड खेळताय?”; अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल

दरम्यान, यानंतर हातात दांडके घेऊन वाजीदसह अन्य वाहनचालक व क्लिनरला लाथाबुक्यांनी व दांडक्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याच दरम्यान, मुख्य संशयित कृष्णा मुंढे याने वाजीद यांच्या मालवाहू गाडीच्या डॅशबोर्डच्या कप्प्यातून दीड लाख रुपये लुटमार करुन नेले. याबाबत माहिती कळताच, म्हसरुळ पाेलीस ठाण्याचे (Mhasrul Police Thane) वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक दीपक पटारे, सचिन मद्रुपकर आदी दाखल झाले. पाेलिसांनी घटनाक्रम जाणून घेत व घटनास्थळाची पाहणी करुन वाजीदच्या फिर्यादीन्वये गुन्हा नाेंदविला आहे. तपास मद्रुपकर करत आहेत. दरम्यान, पाेलिसांनी या म्हशी पांजरापाेळ संस्थानात दाखल केल्या आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या