Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची...

Nashik News : मुख्य सचिव राजेशकुमार यांनी केली रामकाल पथसह विविध कामांची पाहणी

नाशिक | Nashik

राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार (Chief Secretary Rajesh Kumar) यांनी आज सायंकाळी रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

नाशिक त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार आज नाशिक येथे आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

YouTube video player

यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी रामकाल पथ, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींसह महानगरपालिकेतर्फे (NMC) कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...