नाशिक | Nashik
शनिवार (दि.२७) पासून शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटीलिंक बसच्या (Citilink Bus) चालकांनी वेतन वाढीसाठी संप पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांची (Passengers) चांगलीच गैरसोय झाली होती. यानंतर अखेर आज सिटीलिंक चालक आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या संपावर तोडगा निघाला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिटिलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
याबाबत अधिक माहिती अशी की, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि ठेकदार (Contractor) यांच्यात बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत चालकांच्या (Drivers) बऱ्यापैकी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर नाशिकरोड आणि तपोवन या दोन्ही डेपोमधील सिटीलिंक बस सेवा पूर्ववत सुरू झाली.
हे देखील वाचा : Nashik News : सिटीलिंकच्या चालकांविरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत नाशिकरोड व आडगावला गुन्हे
दरम्यान, शनिवारपासून मनसेना (MNS) कामगार सेनेतर्फे हा संप पुकारण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून एकही बस बाहेर दैनंदिन मार्गावर न धावल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. अखेर आज या संपावर तोडगा निघाल्याने उद्यापासून सिटीलिंकच्या बस नेहमीच्या मार्गावर धावतांना दिसणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा