Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Election Update : मनमाडला भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना...

Nashik Election Update : मनमाडला भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना धुतलं, मतदारांची पळापळ

मनमाड | Manmad

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) आज (दि.२) रोजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ४६.७१ टक्के मतदान झाले.मतदानाची वेळ संपेपर्यंत हा आकडा ५० टक्क्यांच्यावर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मतदानावेळी त्र्यंबक आणि भगूर या दोन नगरपरिषदांच्या मतदानाच्या केंद्रांवर गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले होते. त्यानंतर मतदान संपण्याच्या अर्धा तास अगोदर मनमाड नगरपरिषदेच्या एका मतदान केंद्रांवर भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, बंदोबस्त वाढवला

YouTube video player

मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये (BJP and Shivsena Workers) तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांची चांगलीच पळापळ झाली होती. तर त्र्यंबकला नुतन त्र्यंबक विद्यालय येथील मतदान केंद्रावर प्रवेश करताना गेटजवळ उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी मतदारांना आमच्याकडे लक्ष राहू द्या असे सांगितले जात होते. यावेळी पोलिसांनी या उमेदवारांच्या समर्थकांना हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेनंतर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

तर भगूर (Bhagur) येथील एका मतदान केंद्रावर शिवसेनेच्या (Shivsena) एका उमेदवाराचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी शिवसेनेकडून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या शांता गायकवाड यांचे नाव मतदारांच्या यादीत कुठेही दिसत नसल्याने हा प्रकार समोर आला.आपलेच नाव नसल्याने खुद्द उमेदवाराला या गोंधळात अडकावे लागल्याचे दिसून आले.

येवल्यात राष्ट्रवादी व शिवसेना समर्थकांमध्ये बाचाबाची

येवला शहरातील प्रभाग ९ मधील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी व शिवसेना समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक अनिल भवारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर या केंद्रावर विशेष दलातील पोलीस तैनात करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : भाजपची काँग्रेस अन् MIM सोबत युती; मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई । Mumbai राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात सध्या अनपेक्षित युती आणि आघाडीचे नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने एमआयएमसोबत हातमिळवणी...