Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार

Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केद्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या (Panchayat Raj Department) वतीने देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) इगतपुरी गटातील ग्रामपंचायत, मोडाळे या ग्रामपंचायतींला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेकरिता पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रपती यांच्याकडून ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या (Central Governtment) वतीने पंचायत राज संस्थांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्सा हन देण्यासाठी तसेच गौरव करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार देण्यात येतात, या पुरस्कारांची नामांकने ऑनलाईन प्रणा लीवर भरून फ्रीझ करून राज्य शासनास पाठविण्यात येतात. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर, ब्लॉक स्तरीय समिती व जिल्ह स्तरीय समिती यांनी प्रस्तावांची छाननी करून उच्चतम गुणवत्तेनुसार पंचायत राज संस्थांचे प्रस्ताव राज्य शासनास ऑनलाईन प्रणालीवर सादर केले जाते. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या संनियंत्रणाखाली पंचायत राज पुरस्कारांबाबत कार्यवाही करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने (Modale Gram Panchayat) स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले असून माझी वसुधरा अंतर्गत वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन केले आहे.

महाराष्ट्रातून (Maharashtra) ६ ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये मोडाळे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेत मोडाळे ग्रामपंचातयीने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्कारासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व गट विकास अधिकारी तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) महत्वाचे योगदान आहे. दरम्यान. आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी अति दुर्गम भागातील मोडाळे गावाने विकासाची साधलेली किमया वाखानण्याजोगी असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेली उच्चत्तम कामगिरी पुरस्कारास पात्रता ठरली म्हणून ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

ध्येयांसाठी काम करावे

मोडाळे ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मोडाळेसह जिल्ह्यातील गावांनी गावाच्या सर्वागीण विकासासाठी व १७ शाश्वत विकासाची ध्येये व गरिबीमुक्त आणि उपजिविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायो गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभुतसुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव आणि लिंग समभाव पोषक गाव या ९ विषयांवर काम करावे.

आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...