Tuesday, February 3, 2026
HomeनाशिकEknath Shinde : सिंहस्थ नाशिकला जागतिक नकाशावर आणणारा ठरेल - उपमुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde : सिंहस्थ नाशिकला जागतिक नकाशावर आणणारा ठरेल – उपमुख्यमंत्री शिंदे

नाशिक | Nashik

सिंहस्थातून नाशिकचा (Nashik) चेहरामोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. सिंहस्थात नाशिक शहरात संत-महंत यांची पावले उमटणार आहेत.सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने येत्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दि.१३) रोजी ऑनलाईन पद्धतीने ठक्कर डोम येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले, “आज ५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होत असून हा महान क्षण आहे. हा धार्मिक सोहळा नाशिकला जागतिक नकाशावर (Map) आणणारा ठरेल. सोहळ्याकरिता दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रशासन कार्यरत आहे. मोठ्या संख्येने भाविक (Devotees) येणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी शासन-प्रशासनावर असून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे. सिंहस्थातील विकासकामे भविष्यातील नाशिकचे अभिमान बिंदू ठरतील. त्यामुळे आजच्या सिंहस्थ कामांमुळे नाशिकचा विकास करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. सिंहस्थात जे भाविक येतील त्यांचे नियोजन उत्तम आणि पारदर्शक असले पाहिजे. सिंहस्थात अनेक आव्हाने असून नियोजनामध्ये प्रत्येकाचा कस लागणार आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, दोघांची खऱ्या अर्थाने परीक्षा असणार आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले, “गोदावरीला (Godavari) दक्षिण गंगा म्हटले जाते आणि विकासकामांच्या शुभारंभाच्या माध्यमातून नाशिक शहरात विकासाची गंगा येत आहे. नाशिकमध्ये सिंहस्थात कोट्यवधी लोक येतील. ३१ ऑक्टोबर २०२७ रोजी सिंहस्थाचे ध्वजारोहण होणार असून, यंदाचा सिंहस्थ २२ महिने चालणार आहे. सिंहस्थामुळे नाशिकमध्ये तयार होणाऱ्या सुविधा पुढील काळात दर्जेदार पद्धतीने टिकतील. साधूग्राम, स्वच्छता व्यवस्था, रामकुंड आणि कुशावर्तचे पावित्र्य आदी सर्व बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. आपला घराचा कार्यक्रम समजून सर्वांनी यात सामील व्हायचे असून, याचे पवित्र राखायचे आहे. सिंहस्थ प्रचारासाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी राबवली असून, त्यामाध्यातून जगभरात कुंभमेळा पोहोचवायचा आहे. सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे. हा एक महान सोहळा असून तो पार पडण्यासाठी आपल्या येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार योग्य पद्धतीने झाला पाहिजे. उत्तम पद्धतीने नियोजन करून सिंहस्थाचा लौकीक जगभर पोहोचवा, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे”, असे शिंदे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...