Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकBirhad Protester Meet Raj Thackeray : बिऱ्हाडच्या शिष्टमंडळाने मांडल्या व्यथा; राज ठाकरेंनी...

Birhad Protester Meet Raj Thackeray : बिऱ्हाडच्या शिष्टमंडळाने मांडल्या व्यथा; राज ठाकरेंनी दिली ‘ही’ ग्वाही; नेमकी काय चर्चा झाली?

नाशिक | Nashik

गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या (Nashik) आदिवासी आयुक्तालयासमोर आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी करा, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड संघर्ष आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे (Demand) सरकारकडून (Goverment) दुर्लक्ष केले जात आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने (Delegation) मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत (Mumbai) शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आंदोलनाच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय त्यांच्या सर्व समस्या देखील जाणून घेतल्या.

YouTube video player

तसेच येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत (Minister) चर्चा करून लवकरात लवकर यावर तोडगा काढून न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही राज ठाकरेंनी आंदोलकांना दिली. तसेच शिष्टमंडळासोबत चर्चा करून आंदोलकांना शिवतीर्थाच्या बाहेर येऊन न्याय देण्याची हमी देखील त्यांनी दिली.

दरम्यान, यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲड रतनकुमार इचंम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जनहित कक्ष व विधी विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू उपस्थित होते. तर रोजंदारी कर्मचारी संघटनेकडून अंकुश चव्हाण, सुवर्णा वाघ, नवनाथ खादे, ज्ञानेश्वर लेंडे, कुणाल नवाळी, रोहिदास पवार, मनोज इमापाळ, चंद्रशेखर दळवी यांच्यासह सुमारे आंदोलनाचे ६० सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...