Saturday, May 18, 2024
HomeनाशिकVideo : दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला पाणी; नाशकात पूरसदृश्य स्थिती

Video : दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला पाणी; नाशकात पूरसदृश्य स्थिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदापात्रात पाण्याची पातळी चांगलीच वाढली. नाशिकच्या पुराचे परिमाण समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती बुडण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपेक्षाही वरती पाणी आले आहे….

- Advertisement -

गंगेतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे नदीकाठी असलेली दुकानांमध्येही पाणी शिरू लागल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने सुरक्षित स्थळी हलविली आहे. जी दुकाने हलविण्यासासारखी नाहीत अशा दुकानातील सामान नागरिकांनी हलविण्यास सुरुवात केली आहे.

Video : गंगापूर धरण @९८; गोदावरीला येणार पूर

दुसरीकडे, देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगण पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. गोल घुमटालाही पाणी लागले असून आता पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील सिमेंट कॉंक्रीट काढल्यानंतरही नदी दुथडी भरून वाहू लागल्यामुळे भले मोठे पाण्याने भरून वाहणारे नदीपात्र पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केलेली दिसून आली.

आपत्ती निवारण विभागाचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी नदीकाठी आहे. महापालिकेकडूनही बंदोबस्तावर अनेक नागरिकांना ठेवण्यात आले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी जे जवान प्रयत्न करत आहेत.

दुपारी दोन वाजता गंगापूर धरणातून ३ हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे. तर दोन तासांनी म्हणजेच सायंकाळी चार वाजता हा विसर्ग वाढवून ४ हजार क्युसेक्सवर नेला जाणार आहे.

नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला असून पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती काळात आपत्ती निवारण कक्षाची वा बंदोबस्तावर असलेल्या जवानांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या