Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Nashik News : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दहिवड | वार्ताहर | Dahiwd

अचानक पाऊस (Rain) सुरु झाल्याने घराजवळ लिंबाच्या झाडापाशी आश्रयाला उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा (Farmer) वीज पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.२०) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वऱ्हाळे ता.देवळा येथे घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, केदा यादव खैरनार (५१) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते
शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक पाऊस आल्याने घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबले. मात्र त्याचवेळी सदर लिंबाच्या झाडावर वीज (lightning) पडल्याने त्याचा झटका खैरनार यांना बसला.

YouTube video player

यावेळी लिंबाच्या झाडाचा काही भाग देखील जळून खाक झाला. यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना मालेगाव (Malegaon) येथील शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत केदा खैरनार यांच्यावर रात्री ८.३० वाजता शोकाकुल वातावरणात वऱ्हाळे येथील अमरधाम
येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील कर्ता पुरुष मयत झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे तर घटनेनंतर प्रशासकीय कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत कारवाईची (Action) तजबीज सुरू केल्याची माहिती देवळा तालुका प्रशासकीय यंत्रणेने दिली.

ताज्या बातम्या