नाशिक | प्रतिनिधी
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस होईल असा कुठलाही धोका निर्माण झालेला नाही अशी माहिती कृषी अभ्यासक व हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. परीणामी महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस होणार अशा बातम्या पद्धतशीरपणे पेरून शेतकऱ्यांना घाबरण्याचे ‘राजकारण’ काही समाजविघातक शक्ति करीत आहेत.
भारतातील मंदीचे वातावरण, विकासाचा व घटलेला जीडीपी वृध्दी दर, महीलांवर वाढलेले अत्याचार आदी अनेक गोष्टींचा विसर पडावा व याबाबत जनतेने प्रश्न विचारु नये यासाठी दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे अशी शंकाही या खोट्या हवामान माहितीमुळे येते आहे असे ही जोहरे म्हणाले.
डिसेंबरच्या 15 तारखेनंतर महाराष्ट्रात थंडी वाढू लागेल अशी माहिती देत, शेतकर्यानी अवकाळी पावसाची भिती न बाळगता रब्बी हंगामातील पिकांवर लक्ष द्यावे असे आवाहन देखील किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.