Thursday, July 9, 2026
HomeनाशिकNashik News : आमदार डॉ. राहुल आहेर गायब झाल्याची चर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांची...

Nashik News : आमदार डॉ. राहुल आहेर गायब झाल्याची चर्चा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत नसल्याने नाराजी

मेशी | विष्णू जाधव | Meshi

देवळा, चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांवर विविध पक्ष गट-तट विसरून रस्त्यावर उतरले असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Rahul Aher) एकदाही शेतकऱ्यांच्या भेटीला आले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर (Social Media) आमदार आहेर गायब, अशा पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

- Advertisement -

अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोलटंचाई निर्माण झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंपांवर मिळत नव्हते. त्यासाठी ठिकठिकाणी वणवण करावी लागत होती. ड्रममध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली होती. शेतकरी अडचणीत असताना अशावेळी आमदार डॉ. राहुल आहेर कुठेच फिरकले नाहीत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यांची साधी दखलसुद्धा त्यांनी घेतली नाही. आजही आमदार शेतकऱ्यांच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आमदार आहेर गायब, अशा पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

महिनाभरापूर्वी प्रसार माध्यमातून आमदार (MLA) आहेर यांनी नाफेडकडून खरेदी केला जाणारा कांदा हा बाजार समित्यांच्या आवारातच खरेदी होईल, असे सांगितल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्रमी आवक वाढली होती. परंतु फेडरेशनने कांदा खरेदी केला नाही. त्यामुळे कांदा दरात ५०० रुपयांची घसरण झाली व याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांची ही समस्या अनेक दिवस सुरू होती. तिचे निराकरण करण्यासाठी आमदारांनी कुठलेही प्रयत्न केले नाहीत.

तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने झाली. त्याची साधी दखलही त्यांच्याकडून घेतली गेली नाही. आमदार डॉ. राहुल आहेर तालुक्यातील जनतेसाठी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली होती. या प्रश्नात आमदार आहेर यांनी लक्ष घातले असते तर लवकर विषय मार्गी लागला असता, अशी आशा शेतकऱ्यांना होती. आमदार डॉ. आहेर हे देवळा-चांदवड मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तसेच ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत.

मात्र आजपर्यंत मतदारसंघात त्यांनी एकही आमसभा घेतली नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाब विचारला नाही. त्यामुळे प्रशासनाला त्यांचा धाक राहिलेला नाही, असे उघडपणे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध संस्थांमध्ये ताळमेळ राहिला नाही. अधिकाऱ्यांवर आमदारांचा वचक राहिला नसल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. देवळा तालुक्याचे शिल्पकार म्हणून डॉ. डी. एस. आहेरांचे मोठे योगदान आहे. परंतु त्यांचे पुत्र असलेले आ. डॉ. राहुल आहेर यांनी तालुक्याची मोठी निराशा केली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक आणि शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

ताज्या बातम्या

Nashik NMC News : महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; कारण काय?

0
नाशिक | Nashik शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल, जागोजागी पडलेले खड्डे, त्यातून घडलेले अपघात, जखमी नागरिक तसेच शहरातील विविध भागांतील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब...