Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik News : पिंपळगाव कृउबा समितीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

Nashik News : पिंपळगाव कृउबा समितीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

पिंपळगाव | वार्ताहर | Pimpalgaon

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या (Onion) बाजारभावात ३०० ते ४०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे काल (सोमवारी) सकाळी संतप्त शेतकऱ्यांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला होता.

- Advertisement -

तसेच कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे यासह विविध मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले होते. त्यानंतर आज (मंगळवारी) पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pimpalgaon Agricultural Produce Market Committee) शेतकऱ्यांनी (Farmer) आंदोलन केले आहे.

YouTube video player

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो (Tomato) आडत्याकडे जवळपास ३०० शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच कोटी रुपये बाकी असल्याने चार महिन्यांपासून शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून सकाळी आठ वाजेपासून पिंपळगाव बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. या आंदोलनबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी रेल्वेमंत्री बैठक घेणार

0
लोणी |वार्ताहर| Loni पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गा संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना...