Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Onion News : लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांचे...

Nashik Onion News : लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण; शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

लासलगाव | हारून शेख | Lasalgaon

देशांतर्गतील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची (Summer Onion) आवक वाढत्या प्रमाणात होत असल्याने कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या (Onion) बाजारभावात ३०० ते ४०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष, जय किसान फोरम, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, छावा क्रांती संघटनेचे पदाधिकऱ्यानी आक्रमक होत आज (सोमवारी) सकाळी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करत कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे यासह विविध मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल एक तास ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

लासलगाव बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज कांदा मार्केट यार्ड मध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे वरिष्ठ नेते गणेश निंबाळकर, जय किसान फोरम विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष केदार नवले, छावा क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष गोरख संत, स्थानिक शिवसेना नेते केशव जाधव, सर्जेराव तनपुरे, दिलीप गायकवाड मच्छिंद्र गांगुर्डे, योगेश रोकडे, प्रफुल गायकवाड, दीपक पवार, लक्ष्मण टापसे यांच्या शेतकऱ्यांनी वरती चढत शोले स्टाईल आंदोलन (Agitation) केले.

लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसह (Farmer) विविध संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन सुरू असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत समजताच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला .कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी लवकरच चर्चा करत कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केले जाईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी आंदोलन करताना खाली येण्याची विनंती केली असता या विनंतीला मान देत खाली आले मात्र आमच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तेराशे ते पंधराशे रुपये कांद्याला सरासरी बाजार भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने आज आम्ही लासलगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर (Water Tank) चढत शोले स्टील आंदोलन केले. कांद्याला पंचवीस रुपयांच्या वर दर मिळावा तसेच कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क कायमस्वरूपी रद्द करावे व नाफेड एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी ही थेट बाजार समितीच्या आवारातून करावी या मागण्या आम्ही केल्या.

गणेश निंबाळकर, प्रहार जनशक्ती पक्ष वरिष्ठ नेते

कांद्याला एक किलोला वीस रुपये खर्च येत असताना आज बाजार समितीमध्ये बारा ते पंधरा रुपये किलोंनी कांद्याला बाजारभाव मिळत आहे. मग घेतलेले कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा मोठा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा असताना केंद्र सरकार कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क मागणी करूनही हटवत नसल्याने आज आम्ही लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केले. नाफेड, एनसीसीएफची पारदर्शक खरेदी होण्यासाठी थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी केंद्र सरकारने केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केली.

निवृत्ती न्याहारकर, विभागीय अध्यक्ष, जय किसान फोरम

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...