चांदवड | वार्ताहर | Chandwad
तालुक्यातील दिघवद (Dighwad) येथे ३३ वर्षीय पित्याने (Father) आपल्या दोन मुलांसह (Two Children) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, दौलत (सचिन) रामदास हिरे (वय ३३) असे मयत वडिलांचे नाव असून, प्रज्ञा दौलत हिरे (वय १०) व गोपाल दौलत हिरे (वय ६ ) अशी दोन मुलांची नावे आहेत. आज (बुधवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, हे तिन्ही मृतदेह (Dead Body) विहिरीतून (Well) बाहेर काढण्यात आले आहेत.
तसेच उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी पोलिसांचा (Police) अधिक तपास सुरू आहे.




