Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा वावर नाही; वनविभागाचा...

Nashik Leopard News : भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा वावर नाही; वनविभागाचा दावा

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये (Bhonsala Military School Area) बिबट्या (Leopard) शिरल्याच्या दाव्यानंतर वनविभाग व पाेलिसांनी (Police) राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला नाही. तरी दक्षता म्हणून वनविभागाचे पथक परिसरात गस्त करत आहेत. शंका असलेल्या ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

शाळेतील व हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकरीता (Student) जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले असून शाळा प्रशासनाकडून परिसरात वाढलेले दाट गवत व इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्री देखील वनविभागाच्या वतीने थर्मल ड्रोन व इतर माध्यमातून शोध मोहीम तसेच गस्त करण्यात येणार आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Leopard News : भोसला मिलिटरी स्कूल परिसरात दिसला बिबट्या; वनविभागाकडून शोधमोहीम सुरु

आवाहन

नागरिकांना तसेच पालकांना (Parents) विनंती करण्यात येते की, कुणीही घाबरून जाऊ नये तसेच संपूर्ण माहितीचे तथ्य तपासल्याशिवाय व खात्री केल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या अफवा पसरवू नये. बिबट्याचा वावर आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन वनखात्याने केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...