Friday, May 16, 2025
Homeनाशिकमालेगावी चौघांचा मृत्यू; दोघे कोरोनाबधित तर दोघांचे स्वॅब नमुने तपासणीला

मालेगावी चौघांचा मृत्यू; दोघे कोरोनाबधित तर दोघांचे स्वॅब नमुने तपासणीला

मालेगाव l प्रतिनिधी

- Advertisement -

कोरोनाच्या शिरकावामुळे सगळ्यांचीच चिंता वाढविणाऱ्या मालेगावमध्ये आज चौघांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे मालेगावमधील बळींची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या शहरात 96 वर पोहोचली आहे.

आज दुपारी कोरोना उपचार केंद्र असलेल्या जीवन रुग्णालयात 49 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. दोघेही हाजी अहमद पुरा व नयापुरा भागातील असल्याचे समजते.

दुसरीकडे सामान्य रुग्णालयात कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. यात 32 वर्षीय व 45 वर्षांचे व्यक्तींचा समावेश आहे. दोघेही बेलबाग परिसरातील असल्याचे समजते.

दोघांचे स्वब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालाकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागून आहे.

मालेगाव शहरातील मृतांची संख्या वाढू लागल्यामुळे आज मनपा प्रशासनाकडून मुस्लिम धर्मगुरूंनी बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा मृतदेह निर्जंतुक करून सोपविला जातो. तसेच या मृतदेहाला अंघोळ घालणे इतर विधी केल्या तर मृतदेहातून कोरोना रोगाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण मृत झाल्यास त्याच्या अंत्यविधीला गर्दी होऊ नये, मृदेहास अंघोळ घालू नये विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याबाबत सूचना करून जनजागृतीचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मनपा उप आयुक्त नितीन कापडणीस यांनी दैनिक देशदूतशी बोलताना दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...