Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik News : येवल्याच्या भूमिपुत्राचा पुणे महानगरपालिकेवर झेंडा; खाडे कुटुंबाचा सलग चौथा...

Nashik News : येवल्याच्या भूमिपुत्राचा पुणे महानगरपालिकेवर झेंडा; खाडे कुटुंबाचा सलग चौथा विजय

नाशिक | प्रतिनिधी | Yeola

येवला तालुक्यातील (Yeola Taluka) दुर्गम पन्हाळसाठे गावचे रहिवासी दत्ता खाडे यांनी पुण्यासारख्या शहरात आपला राजकीय ठसा उमटविला आहे. २००७ मध्ये खाडे हे स्वता त्यांनतर दोन वेळा पत्नी नीलिमा खाडे आणि यावेळी पुत्र अपूर्व खाडे याने विजय मिळवत सलग चार वेळा पुणे महानगरपालिकेवर खाडे कुटुंबाचा (Khade Family) झेंडा रोवला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?

YouTube video player

सलग चार वेळा निवडून येणारे खाडे कुटुंब हे पन्हाळसाठे येथील भूमिपुत्र असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. पुणे महानगरपालिकेवर (Pune Municipal Corporation) दत्ता खाडे हे २००७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी निलिमा खाडे याही २०१२ व २०१७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तर त्यांचा मुलगा अपूर्व खाडे याने भाजपकडून २०२६ मध्ये डेक्कन , मॉडेल कॉलनी प्रभागातून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला आहे.

हे देखील वाचा :  Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?

पुण्यातील प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, आणि मॉडेल कॉलनी या परिसरात खाडे कुटुंबाने आपल्या कार्यकौशल्याने, कर्तृत्वाने आणि भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून राजकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या परिश्रमामुळे पुणे शहरातील आपल्या प्रभागातील अनेक प्रकल्प पूर्णत्वचेस नेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाने अपूर्व खाडे याने मॉडेल कॉलनी प्रभागातून मोठा विजय मिळवून खाडे कुटुंबाचा सलग चौथा विजय साकारला आहे.

हे देखील वाचा :  Malegaon Mayor Reservation : माजी आमदार शेख महापौर पदासाठी अनुभवी की नवीन चेहऱ्याला संधी देणार?

पुण्यात व्यावसायिक व राजकीय कारकीर्द घडवतानाही खाडे कुटुंब पन्हाळसाठे (ता. येवला) गावाला कधीही विसरले नाही. त्यांनी आपल्या गावी अनेक विकासकामांसाठी भरीव योगदान दिले आहे. खासकरून, गावातील रस्ते, पाणीपुरवठा, शाळा आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी खाडे कुटुंबाने वेळोवेळी सहकार्य केले आहे. अपूर्व खाडे यांच्या निवडीला समारंभ आयोजित करून गावात आनंद साजरा करण्यात आला. यावेळी, अनेक गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. खाडे कुटुंबाच्या कार्यामुळे त्यांचे नाव फुलवले गेले आहे, आणि त्यांच्या योगदानामुळे पन्हाळसाठे गावातील विकासाला गती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....