Wednesday, September 9, 2026
HomeनाशिकGirish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच सिंहस्थ पुस्तिकेवर गिरीश...

Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच सिंहस्थ पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; राजकीय वातावरण तापलं

नाशिक| Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ कुंभपर्व’ माहिती पुस्तिकेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना, या अधिकृत पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ‘पालकमंत्री’ असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

पुस्तिकेवरील उल्लेखावरून प्रश्नचिन्ह

काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्या उपस्थितीत या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते. पुस्तिकेच्या मागील बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन यांचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोखाली ‘पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री, गिरीश महाजन’ असे लिहिण्यात आले आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद अधिकृतपणे जाहीर झालेले नसताना हा उल्लेख चुकून झाला आहे की भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेंच

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने (State Government) गिरीश महाजन यांच्याकडे ‘कुंभपर्व मंत्री’ म्हणून जबाबदारी सोपवली आहे. मात्र, आगामी कुंभमेळ्यासह राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आधीपासूनच रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत महाजन यांचा पालकमंत्री असा झालेला उल्लेख राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे.

५३० कोटींचे बनावट टेंडर प्रकरणही चर्चेत

दुसरीकडे, नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली ५३० कोटी रुपयांच्या बनावट टेंडर घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तनय महाजन याला मुंबईतून अटक केली आहे. संशयित आरोपीने कुंभमेळ्याच्या कामांची टेंडर्स वाटप करणारा अधिकारी असल्याचे भासवून, महाराष्ट्र सरकारची बनावट कागदपत्रे आणि आयुक्त प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी वापरून सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Potholes News : इंदिरानगरमध्ये १०० मीटर रस्त्यावर अचानक मोठा खड्डा;...

0
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) १०० मीटर रस्त्यावर प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ मधील सुदर्शन लॉजच्या बाजूला अचानक मोठ्या स्वरूपाचा...