नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) जिल्ह्यात शेतातील पिकांचा (Crops) अक्षरशः चिखल झाला असून, या नुकसानीमुळे बळीराजाचा जणू कणाच मोडला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील (District) १,५०९ गावांतील २ लाख ४७ हजार १९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २ लाख ६३ हजार २४७ शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक नुकसान येवला तालुक्यात (Yeola Taluka) झाले आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी बरसलेल्या जोरदार तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा आणखी वाढणार आहे.
जिल्ह्यात मे महिन्यापासूनच पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) खरिपाच्या तयारीसाठी खोळंबा झाला. परिणामी पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच पाऊस अधूनमधून उघडीप देत बरसतच राहिला. त्यामुळे कांदा, भातशेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागा फुलशेतीला पावसाचा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यातच तर पावसाने चांगलाच कहर केला. आलेले पीक पावसामुळे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
दसऱ्यानंतर उघडीपीचा अंदाज
मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता, मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी १८ जिल्ह्यांमध्ये मंगळवार (दि.३०) पासून पावसाचा जोर कमी होऊन तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण आणि विदर्भात दसऱ्यानंतरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रावरून पाऊस पाडणारे कमी दाबाचे क्षेत्र सध्या सौराष्ट्रात पोहोचले आहे. पुढील २४ तासांत हे क्षेत्र अरबी समुद्रात उतरून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन ओमानच्या दिशेने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात उघडीपीची शक्यता निर्माण झाली असल्याचे खुळे यांनी सांगितले.
| तालुका | गावे | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र |
| मालेगाव | ११७ | ९६४८१ | ५४२६६ |
| बागलाण | १५८ | ३४१२० | २४७१८ |
| नांदगाव | १०० | १४७४१ | ३६३३४.५६ |
| कळवण | ८५ | ३,५६७ | १६८६.५० |
| देवळा | ४८ | १.५२५ | १६८ |
| दिंडोरी | १४६ | २८१० | ३३६४ |
| सुरगाणा | १६१ | २५८३ | ८२३ |
| नाशिक | ५५ | १,९९१ | ९२६ |
| त्र्यंबकेश्वर | ४७ | ८५५ | २६३.७० |
| पेठ | १४५ | ७५१० | ४३८६.७० |
| इगतपुरी | १३ | २५० | ७५.३० |
| निफाड | १३५ | १६,५९५ | १०१८०. ९९ |
| सिन्नर | ७३ | ५५१ | ३१८ |
| चांदवड | ११२ | ३६२३० | ४५२६२ |
| येवला | १२४ | ४३.३९८ | ६४१७१ |
| एकूण | १५१९ | २८३५०६ | २४.७०१९.९५ |
पिकनिहाय नुकसान क्षेत्र
| २१४ मका | १४९३७७ |
| सोयाबीन | २३६७४ |
| भात | ५५७० |
| कापूस | १६१८० |
| भाजीपाला | ३०१२० |
| कांदा | ३८७२३ |
| कांदा रोपवाटिका | ३४७ |
| ऊस | ३५ |
| द्राक्ष | ३१९ |
| सीताफळ | ९ |
| डाळींब | ५२३ |
| इतर | २१४ |




