Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain News : जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची दमदार हजेरी; नद्यांना पूर,...

Nashik Rain News : जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची दमदार हजेरी; नद्यांना पूर, घरांत शिरले पाणी

नाशिक | Nashik 

मान्सूनची गोव्यातून महाराष्ट्रात एंट्री झाली असून, यंदा अंदाजापेक्षा मान्सून (Monsoon 2025) १२ दिवसआधी लवकर दाखल झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने कोकणात व महाराष्ट्र अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. केरळमध्ये अंदाजापेक्षा आठ ते दहा दिवस आधी लवकर दाखल झाला, त्यानंतर मान्सूनचा प्रवास गतीने सुरू होता. त्यानंतर आज मान्सून गोव्यातून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मान्सूनच्या आगमनानंतर आणि हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. यानंतर जिल्ह्यातील सिन्नर, येवला यासह विविध भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने (Rain) हजेरी लावली आहे.

YouTube video player

सिन्नरला पावसाने झोडपले; नद्यांना पूर, रस्ते बंद | Sinnar | Rain | Nashik | Nashik Rain

दरम्यान, मनमाड शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दुसरीकडे सिन्नरमधील (Sinnar) सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे बघायला मिळत आहे. याशिवाय काही घरांत देखील पाणी शिरल्याचे चित्र आहे. तसेच आज दुपारच्या सुमारास नाशिक शहरात (Nashik City) देखील पावसाने तासभर हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती.

जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज

नाशिक जिल्ह्यात २७ मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात व घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा प्रतितास ४० ते ५० कि.मी. वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...