Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नवीन नाशकात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय

Nashik News : नवीन नाशकात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय

प्रशासनाबरोबर नागरिकांचाही बेजबाबदारपणा

नवीन नाशिक | निशिकांत पाटील | New Nashik

शहरातील सर्वात जास्त दाट लोकवस्ती असलेल्या नवीन नाशिक परिसरात (New Nashik Area) नागरिक (Citizen) पाण्याचा प्रचंड गैरवापर व अपव्यय करीत असल्याचा प्रथम समोर येत आहे.

- Advertisement -

नवीन नाशकातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी (Water) हे वेगवेगळ्या वेळेत येत असते. काही ठिकाणी पहाटे, काही ठिकाणी सकाळी, दुपारी, संध्याकाळी तर काही ठिकाणी रात्री पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, सगळीकडे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी तांत्रिक अडावणीमुळे पाणीपुरवठा (Water Supply) कमी अधिक दाबाने होतो. पाण्याचा योग्य पद्धतीने वापर हि काळाची गरज आहे. मात्र परिसरातील अनेक भागात नागरिक बेशिस्त, बेजबाबदारपणे गैरवापर व अपव्यय करताना दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने नवीन नाशिककरांवर पाण्याचे संकट नाही.

याबाबत नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेऊन पाणी ही काळाची गरज आहे, असे लक्षात घेऊन अपव्यय व गैरवापर टाळावा, असे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेतर्फे (NMC) पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र नागरिकांना अद्यापही पाण्याचाचत जनजागृतीची आवश्यकता आहे.

असा होतो गैरवापर

  • नळी लावून वाहने धुणे.
  • रत्यातच कपड़े व भांडे धुवत बसून पाणी वाया घालवणे.
  • पाण्याच्या टाक्या भरून वाहिल्यानंतरही नळ बंद न करणे.
  • पाणी भरून झाल्यानंतर बाथरूम, टॉयलेटमध्ये नळ चालू ठेवणे.
  • नळाला तोट्या नसणे.
  • पाणी मीटर काढून ठेवणे.
  • पाण्याच्या पाईपला वीज मोटार लावणे.

मनपा प्रशासन जबाबदार

  • पाणी पुरवठ्याबाबत नियोजनाचा अभाव.
  • अनेक ठिकाणी पाईपला गळती सुरु असताना तीदुरुस्त न करणे.
  • जुन्या व जीर्ण झालेल्या पाईपलाईन न बदलल्याने पाईपलाईन फुटणे.
  • पिण्याच्या पाईपलाईन शेजारीच ड्रेनेज लाईन असल्याने तेच पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणे.
  • अनेक ठिकाणी पाईप लाईन या कमी जास्त व्यासाच्या टाकणे.
  • ज्या ठिकाणी नागरिक किंवा व्यावसायिक थेट पाईप लाईनला वीज मीटर लावतात त्या ठिकाणी कारवाई न करणे.
  • ज्या ठिकाणी पाणी गळती सुरु असेल त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना न करणे.

पाणी बचत ही काळाची

गरज नागरिकांनी पाणी जपून वापरायला हवे. पाण्याचा अपव्य होता कामा नये, सांडपाण्याचाही विविध कारणासाठी पुन वौपर करायला हवा. पाणी बचत काळाची गरज आहे.

अभय सोनवणे, नागरिक

बचतीसाठी पुढाकार घ्यावा

सध्या नवीन नाशिक भागातील पाणी गैखापराचे चित्र अतिशय विचित्र आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय व गैरवापर टाळायला हवा. पाणी असेच वापरले गेले तर भविष्यात भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल.

अक्षय परदेशी, सामाजिक कार्यकर्ते

पाण्याची किंमत कधी कळणार?

नागरिकांना पाण्याची किंमत कधी कळणार? रस्त्यावर इतके पाणी तक्तात की जणू पाणी टासयची स्पर्धाच सुरु असते सर्व रस्त्यावर पागीच पाणी दिसते. हे थांबले पाहिजे

स्वाती चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या

जनप्रबोधनाचा उपक्रम

आम्ही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून पाणी जपून वापरा, याबाबत सामाजिक जनारबोधनाचा उपक्रम सेोशल मीडियाच्या माध्यमातून राबवित आहोत. यातून नागरिकांना पाप्याचे महत्व पटवून देत आहेत, नदी वाचवा, पाणी बचता हे पटवून देत आहोत.

तुषार जगताप, सामाजिक कार्यकर्ते

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...