Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : वारकर्‍यांना संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाची आस

Nashik News : वारकर्‍यांना संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाची आस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल’, असा विठ्ठल नामाचा गजर करत वारकर्‍यांच्या (Warkari) दिंड्या (Dindi) त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwar) प्रस्थान करत असून वारकर्‍यांना संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दर्शनाची आस लागली आहे. येत्या शनिवारी पौषवारी यात्रा उत्सवनिमित्त निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) यात्रा आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दिंड्या निघाल्या आहेत. वारकर्‍यांमुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणारे रस्ते फुलून गेले असून भगवे झेंडे,टाळ मृदुंगाच्या तालात भाविक तल्लीन हेाऊन जात आहेत.

- Advertisement -

या उत्सवात सहभागी होण्यासाठी ५०० हून अधिक दिंड्या निघाल्या आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन, माऊलीचा गजर विणेकरी टाळकरींचा अखंड नाद असे उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरण सर्वत्र आहे. वारकर्‍यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाचे (Municipal Administration) वतीने पिण्याच्या पाण्यासाठी पाणी, फिरते स्वच्छतागृह, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

YouTube video player
वारकर्‍यांना संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाची आस | Trimbakeshwar | Nashik | Yatra

दरम्यान, नाशिक शहरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष दुमदुमत आहे. तर नाशिक-त्र्यंबक मार्ग (Nashik-Trimbak Route) भव्य पथक हाती घेऊन चालणार्‍या वारकर्‍यांनी गजबजला आहे. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेच्या आदल्या दिवशी या सर्व दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होणार आहे. त्याआधी या दिंड्यांचा विविध ठिकाणी मुक्काम असून रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...