Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik News: लोंढेंचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त; तब्बल २५ तासांनंतर संपली कारवाई

Nashik News: लोंढेंचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त; तब्बल २५ तासांनंतर संपली कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
सातपूर येथील आयटीआय सिग्नलवरील हॉटेल ऑरा बार गोळीबारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष स्वयंघोषित बॉस प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने बुलडोझर फिरवून त्याचे साम्राज्य नेस्तनाबूत केले. बुधवार (दि.१५) संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी तब्बल २५ तासांनंतर संपली.
महापालिका प्रशासनातर्फे मोठचा पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालविण्यात आला.

लोंढे याच्या आयटीआय पुलालगत असलेल्या नंदिनी नदीच्या पूर रेषेत असलेल्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने नोटीस चिटकवून पाच दिवसांत अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपल्याने महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, महापालिका अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत निर्देश दिले. यावेळी पक्के बांधकाम पाडतांना शेजारी असलेल्या अन्य घरांना धक्का लागू नये व अतिक्रमण काढतांना जीवितहानी होऊ नये याकरिता प्रथम बुधवारी (दि. १५) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत अनधिकृत होर्डिंगचा सांगाडा गॅस कटरच्या सहाय्याने हटवण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी (दि. १६) पहाटे साडेचार वाजेपासूनच जेसीबी व पोकलेन अतिक्रमित घराजवळ जाण्यासाठी नंदिनी नदीच्या एका बाजूने रस्ता तयार करण्यात आला.

- Advertisement -

सकाळी सात वाजेच्या सुमारास अतिक्रमित इमारत तोडण्यास सुरुवात करण्यात आली. अतिक्रमित घराच्या आजूबाजूला झोपड्या असल्याने जेसीबी व पोकलेन चालकाला सावधगिरीने अतिक्रमण तोडावे लागत होते. तब्बल २५ तासांच्या परिश्रमानंतर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात अतिक्रमण विभागाला यश आले.

YouTube video player

मनपाचा मोठा फौजफाटा
मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. झगडे यांच्यासह अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर, उपायुक्त सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, डॉ प्रज्ञा त्रिभुवन, अतिक्रमण विभागाचे सहायक अधीक्षक व वरिष्ठ लिपीक तसेच उपद्रव शोध पथकातील २० कर्मचाऱ्यांसह सर्व पथक प्रमुख सुमारे १०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, अतिक्रमण विभागातील एकूण १४० कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेमध्ये १ जेसीबी, २ पोकलेन, ९ वाहने, १ क्रेन, १ अॅम्बुलन्स व १ अग्निशमन वाहन असा वाहनाचा ताफा होता.

मनपाकडूनही रिल
ज्याप्रमाणे नाशिक पोलीस रिल बनवून गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. त्याच पद्धतीने आता नाशिक महापालिकेने देखील सोशल मीडियावर रिल बनवून आपल्या कामगिरीचे चित्रीकरण दाखवायला सुरुवात केली आहे. गुरुवारी सातपूर परिसरातील माजी नगरसेवक तथा आरपीआय आठवले गटाचा ज्येष्ठ नेता जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईचे रिल बनवून महापालिका आता व्हायरल करीत आहे.

त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी ?
पूररेषेत काम करुन भव्य इमारत तयार झाली तरी मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही, ज्या अधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारात आहे.

-प्रथम बंगल्यावरील अनधिकृत बॅनरचा सांगाडा तोडला.
-आयटीआय पुलाची वाहतूक एका बाजूने बंद करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी.
-कामावर जाण्याची वेळ असल्याने कामगारांना वाहतूक कोंडीचा फटका
-अतिक्रमित इमारतीच्या पुढे इतर झोपड्या असल्याने अतिक्रमण तोडतांना अडचण,
-स्वयंघोषित बॉस प्रकाश लोंढे व त्याच्या टोळीचे अस्तित्व मिटवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. तरी त्याच ठिकाणी -असलेल्या दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावर हातोडा कधी पडेल, याकडे नाशिककरांचे लक्ष.
-अतिक्रमण पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप.
-खुटवड नगर ते सातपूरकडे व नवीन नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी.
-पोलीस प्रशासनाने नाशकातील गुन्हेगारांना महाप्रसाद दिला असल्याने सदरहू अतिक्रमण तोडण्यास विरोध करण्याकरिता कुणीही पुढे आले नाही.

ज्या लोकांनी परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले असेल त्यांनी स्वताः हून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा मनपाकडून ते काढण्यात येईल. त्याचा खर्च देखील त्यांच्याकडून वसूल होणार. तसेच रस्त्यावर अनधिकृ त व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई सुरु आहे.

  • मनिषा खत्री, आयुक्त, मनपा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...