Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात घट; सत्तांतराचा आर्थिक फटका?

Nashik News : नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात घट; सत्तांतराचा आर्थिक फटका?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Market Committee) उत्पन्नात सुमारे ४० लाख रुपयांची मोठी घट झाल्याची बाब उघडकीस आली आहे. माजी खासदार व बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे (Devidas Pingale) यांनी या घटनेमागे प्रशासनातील गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

- Advertisement -

वर्ष २०२४-२५ च्या एप्रिल महिन्यात बाजार समितीचे उत्पन्न सुमारे २ कोटी २३ लाख रुपये इतके होते. मात्र, २०२५-२६ च्या एप्रिलमध्ये हे उत्पन्न घटून फक्त १ कोटी ९० लाख रुपयांपर्यंत आले आहे. देवीदास पिंगळे यांनी २३ मे रोजी जिल्हा उपनिबंधक व राज्याचे पणन व शिष्टाचारमंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

YouTube video player

त्यानंतर मंत्री रावल यांनी तीन आठवड्यांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. बाजार समितीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आर्थिक अनियमितता सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, हे प्रकरण आता राजकीय (Political) रंगही घेत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक उत्पन्नाबाबत माहिती घेताना सचिव घोलप यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ‘माझ्याकडे कोणतीही माहिती नाहीं’ असे सांगून माहिती देण्यासाठी वेळ लागेल, अशी टाळाटाळीची भूमिका घेतली. यावेळी उपस्थित इतर संबंधित कर्मचाऱ्यांकडे माहिती मागितल्यावर ‘आम्ही ही माहिती देऊ शकत नाही, तसे सभापतींचे निर्देश आहेत’ असे उत्तर मिळाले.

बाजार समितीतील सभापती व संचालक यांनी काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजार समितीत जमा होणारे उत्पन्न हे रोख स्वरुपात वसूल केले आहे. संबंधितांना कोणतीही पावती न देता वसूल रक्कम सभापती व संचालक परस्पर वाटून घेत आहेत. तसेच बाजार समितीत असलेले आरक्षित भूखंड ज्याचा वापर शेतकरी व व्यापारी यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी केला जातो. सदर भूखंड हे बाजार समिती सभापती व संचालक कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जवळच्या व पैसे देणाऱ्या बाहेरच्या लोकांना ११ वर्षांच्या करारावर देत आहेत. असे झाले तर शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. पुढील काळात बाजार समितीचे भवितव्य अंधारमय आहे.

देवीदास पिंगळे, माजी सभापती

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...