Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजिओकडून व्हॉईस आणि व्हिडिओ वायफाय कॉलिंग सुरु; काय आहे फिचर जाणून घ्या

जिओकडून व्हॉईस आणि व्हिडिओ वायफाय कॉलिंग सुरु; काय आहे फिचर जाणून घ्या

रिलायन्स जिओने देशभरात कुठेही कोणत्याही वाय-फाय वर काम करणारी व 150 हून अधिक हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करणारी  व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेची सुरुवात  केली आहे. कोणत्याही अतिरिक्त शुल्क विना वाय-फायद्वारे स्पष्ट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे.

ग्राहकहितास प्राधान्य तसेच आणखी बळकटी देण्यासाठी आणि ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने व अनुभव देण्यासाठी जिओने आज वाय-फाय सेवेद्वारे देशव्यापी व्हॉईस आणि व्हिडिओ सुरू करण्याची घोषणा केली.

- Advertisement -

जिओ गेल्या काही महिन्यांपासून या सेवेची चाचणी घेत आहे. प्रारंभाच्या वेळी प्रत्येक ग्राहकांना एक मजबूत अनुभव द्या, असे कंपनीने सांगितले.

जिओने म्हटले आहे की, जिओ वाय-फाय कॉलिंगसह ग्राहक जिओ वाय-फाय-कॉलिंगसाठी कोणतेही वाय-फाय नेटवर्क वापरू शकतात.  व्हॉईस, व्हिडिओ कॉल विना वोल्ट आणि वाय-फाय दरम्यान स्विच-अप करतील “जिओ वाय-फाय कॉलिंग हँडसेटच्या सर्वात मोठ्या इकोसिस्टमवर कार्य करते. जिओ ग्राहक वाय-फाय कॉलद्वारे व्हिडिओ देखील बनवू शकतात आणि हे सर्व कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय येते!”

ही सेवा सादर करताना जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले: जिओमध्ये आम्ही ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत नवनवीन शोध घेत असतो.

या जमान्यात जेव्हा जिओ ग्राहक दरमहा 900 मिनिटांपेक्षा जास्त व्हॉईस कॉल वापरतात आणि वाढत्या ग्राहकसंख्येसोबतच जिओ वाय-फाय कॉलिंग सुरू केल्याने जिओ ग्राहकांच्या प्रत्येक व्हॉईस-कॉलिंग अनुभवात आणखी वाढ होईल. जे भारतातील पहिले सर्व व्होएलटीई नेटवर्क असलेल्या उद्योगासाठी महत्वाचे ठरेल असेही सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या