नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या (Nashik Road Deolali Vyapari Bank) उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालिका कमल आढाव यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोटेशन पद्धती नुसार ही निवड झाली करण्यात आली आहे.
बँकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांची मुदत संपल्याने कमल आढाव (Kamal Aadhav) यांची बिनविरोध (Unopposed) निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, यावेळी ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, बँकेचे अध्यक्ष अशोक चोरडिया, जनसंपर्क संचालक नितीन खोले, जगन आगळे, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, श्रीराम गायकवाड प्रकाश घुगे, सुनील आडके, अरुण जाधव, गणेश खर्जुल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी एकनाथ कदम बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे मंगेश पडवळ आदी उपस्थित होते.




