Friday, November 22, 2024
Homeनाशिकइंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचे उद्घाटन

इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचे उद्घाटन

नाशिक | प्रतिनिधी

मिशन इंद्रधनुष्य २.० आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचे प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रथम गरोदर असलेल्या मातेला रुपये पाच हजारापर्यंत लाभ देऊन सक्षम करणे हे उद्दिष्ट प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत ठेवण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे गरोदरपणामध्ये होणारे माता मृत्यू व बालमृत्यू टाळणे हे होय. त्यामुळे या कार्यक्रमाची समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी २ डिसेंबरपासून पुढील सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वच समाजाने व आरोग्य सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस. यांनी केले.

मिशन इंद्रधनुष्य २.० बाबत सांगताना त्या म्हणाल्या, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढील चार महिने राबवल्या जाणार्‍या मिशन इंद्रधनुष्यमध्ये आपल्या बाळाचे व मातेचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. माता बालक मृत्युदर कमी करणे, हेही आपल्याला सहज शक्य होईल. आरोग्य विभागातील सर्व सेवकांनी दुर्गम भागामध्ये अगदी पेठ, सुरगाणा येथे जाऊन याबाबत जनजागृती करावी व लोकांना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी प्रास्ताविकामध्ये दोन्ही कार्यक्रमांचे उद्दिष्ट मांडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मार्गदर्शनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मांडलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रत्येक पहिले गरोदरपण असलेल्या मातेला प्रधानमंत्री मातृवंदनाचा लाभ कसा मिळेल यासाठी सर्व समाजामध्ये शहरांमध्ये, गावांमध्ये जनजागृती करावी. आपल्या घरातील, परिसरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून लसीकरण सत्राच्या ठिकाणी घेऊन यावे. हे एक सामाजिक काम आहे. तसेच सुदृढ व सशक्त माता, बालक राहावे म्हणून आपण सतत हे काम करत राहू, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या