Friday, May 3, 2024
Homeनाशिकअखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे दोन दिवसीय अधिवेशन

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे दोन दिवसीय अधिवेशन

नाशिक | प्रतिनिधी

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा ( रजि) ह्या तिर्थपुरोहितांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या महासभेचे अधिवेशन दि१९ डिसेंबर रोजी नाशिक येथे ले वा पाटीदार भवन पंचवटी येथे होणार असून दि २० डिसेंबर रोजीचे कार्यक्रम व समारोप त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे अशी माहीती श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहीत संघ नाशिक चे अध्यक्ष आणि अ भा तीर्थ पुरोहित महासभेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतिश शुक्ल आणि अ भा तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय मंत्री आणि श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ नाशिक चे उपाध्यक्ष दिलीप शुक्ल यांनी माहिती दिली, यावेळी तीर्थ पुरोहित महासभेचे पदाधिकारी नवीन नागर, विनोद चतुर्वेदी, संजय चतुर्वेदी उपस्थित होते.
या अधिवेशनाचे यजमानपद श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ नाशिक यांना मिळाले आहे.

- Advertisement -

मथुरा निवासी नामवंत तीर्थ पुरोहित आणि उध्योजक महेश पाठक हे महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून श्री नवीन नागर हे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत श्री महेश पाठक हे महाधिवेशनाचे अध्यक्षस्थानी असतील, प्रयागराज, अयोध्या, मथुरा, काशी, बद्रीनाथ, केदारनाथ, कुरुक्षेत्र, पुष्करराज, नामेश्वराम कांचीपुरम, किशकंधा, कामाख्या , भीमाशंकर तसेच देशभरातून सुमारे ५०० पेक्षा जास्त तीर्थ पुरोहित अधिवेशनास उपस्थित राहतील.

नाशिक व त्रंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी , पुरोहित मंडळी उत्साहाने अधिवेशनाची तयारी करीत असून शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्था नाशिक संस्थेचा सहयोग लाभत आहे या अधिवेशनाचे निमित्ताने विविध तीर्थ क्षेत्राचे तीर्थ पुरोहितांचा परस्पर परिचय होईल, ह्या अधिवेशनात तीर्थक्षेत्रातील पुरोहितांच्या समस्या , पुरोहितांकरिता शासनातर्फे लागणाऱ्या सुविधा, तीर्थ क्षेत्रावर यात्रेकरूंकरिता करावयाच्या सोयी सुविधा, तीर्थ पुरोहितांपुढील अडचणी व त्यावरील उपाय , सरकार कडूनच्या अपेक्षा अशा विविध विषयांवर विचार मंथन होईल.

उपस्थित मान्यवरांचे हस्ते दि १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा रामकुंड पंचवटी येथे श्री गोदावरीचे पूजन होईल, त्यानंतर सकाळी ८ वा पंचवटी परिसरातून सवाध्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.सकाळी १०:३० वा लोकप्रतिनिधी आणि तीर्थ पुरोहित संघाचे मान्यवर पदाधिकाऱ्यांचे हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनास सुरवात होईल.

अधिवेशनाचे प्रथम सत्र सकाळी १०:३० ते १:३० आणि द्वितीय सत्र दुपारी २:३० ते ५:३० असे होईल , सायं ६: ३० वा श्री गोदावरीची महाआरती होईल , सर्व मान्यवर दि २० डिसेंबर रोजी सकाळी त्रंबकेश्वर कडे प्रयाण करतीलपुरोहित मंडळींनी मोठ्या संख्येने दोन्ही दिवशी अधिवेशनाचे संपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महेश पाठक ,सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल , प्रशांत गायधनी जयंत शिखरे व नाशिक त्रंबकेश्वर पुरोहित संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या