Saturday, May 18, 2024
Homeनाशिकगोदावरी नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

गोदावरी नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरी नदीपात्रात एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह रविवारी (दि.१७) सकाळी आढळून आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकली नसून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

रामवाडी येथील वाहनबाजारा समोरील नदीपात्रात रविवारी सकाळच्या सुमारास हा मृतदेह मिळून आला. स्थानिकांना मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या