Wednesday, November 20, 2024
Homeनाशिकविचारक्रांती वाचनालय जाखोरी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची मुग्धा थोरात प्रथम

विचारक्रांती वाचनालय जाखोरी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची मुग्धा थोरात प्रथम

देवळाली कॅम्प।वार्ताहर

”केवळ बोलणे म्हणजे वक्तृत्व नव्हे तर त्याप्रमाणे आपल्याला वागताही आलं पाहिजे. समोरच्याला कळेपर्यंत बोला, कळेल अस बोला आणि कळल्यानंतर नकळतही बोलू नका हे नियम वक्त्यांनी पाळले पाहिजे” असं प्रतिपादन स्पर्धेचे प्रमुख उदघाटक युवा व्याख्याते योगेश नागरे यांनी केले.

- Advertisement -

स्पर्धेला उदघाटन प्रमुख पाहुणे म्हणून संगीता हेमंत गायकवाड, संदीप शिरोळे, सरपंच सुनीता विश्वास कळमकर , राम खैरनार सर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. स्पर्धेसाठी राज्यच्या विविध भागांतून एकूण ७० स्पर्धक सहभागी झाले होते.

केटीएचम महाविद्यालय नाशिकची मुग्धा थोरात हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक अमरावती ची ऋतुजा हरणे, तृतीय बक्षीस पूजा भागवत येवला, चतुर्थ बक्षिस औरंगाबाद येथील इरफान शेख ह्यांनी पटकावले. उत्तेजनार्थ बक्षिसे-गीतल बच्छाव(देवळा),लक्ष्मी मुनेश्वर (गोंदिया), शुभांगी ढोमसे(पिं. बसवंत), आकांक्षा देशपांडे(सोलापूर), मनुनी पटेल(गोंदिया), प्रतीक राऊत(मुंबई), निकिता भास्कर बनकर(जाखोरी),श्रुती बोरस्ते(नाशिक), दीपाली बिसेन(गोंदिया), स्नेहल काशीनाथ सोनवणे(जाखोरी), पूजा दोंड(नाशिक) ह्यांनी पटकावले.

वक्तृत्व स्पर्धांमुळे संवेदनशील, समाजशील युवक घडत असतो. भविष्यात चांगला समाज घडविण्याचे काम वक्त्यांनी करायला हवे, असे मत कार्यक्रमाचे  युवा साहित्यिक किरण सोनार यांनी विचारक्रांती वाचनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मांडले. समारोप प्रसंगी  संदीप वाजे, गंगाधर ताजणे, प्रकाश पगारे, फरीद सैय्यद, श्रेया सुहास खाडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

स्पर्धेचे सूत्रसंचालन सौरव धात्रक, पंकज खाडे, अमोल मगर ह्यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक श्री भास्कर ढोके,नाशिक व श्री प्रवीण शिंदे ,पुणे ह्यांनी बघितले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देविदास राजपूत, सदस्य शिवम अहेर, विश्वास कळमकर, दिनेश क्षीरसागर, निलेश जाधव,बबलू सैय्यद, राहुल धात्रक, गणेश कळमकर, सोपान बोराडे, आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या