Tuesday, November 19, 2024
Homeनाशिक‘प्रेरणा-२०२०’ चे उद्घाटन

‘प्रेरणा-२०२०’ चे उद्घाटन

सातपूर । प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँन्ड अग्रिकल्चरतर्फे लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉलसमोर, लव्हाटेनगर येथे आयोजित ‘प्रेरणा-२०२०’ या ६ व्या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे खा.भारती पवार, आ.देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, उपमहापौर भिकूबाई बागुल, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे उपस्थित होते.

- Advertisement -

महापौर कुलकर्णी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या प्रेरणा प्रदर्शनाचे कौतुक करत सक्षम महिला उद्योजिका तयार होणे काळाची गरज असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. ३ ते ५ जानेवारी असे तीन दिवस होत असलेल्या या प्रदर्शनांतर्गत महिलासाठी शुक्रवार (दि.३) दुपारी ‘सेलिब्रेटी अँकर गुरु हरयानी’ ही पैठणी खेळ स्पर्धा झाली. आज  (दि.४) सकाळी १० वाजता सेल्फ डिफेन्स (निर्भया) प्रात्यक्षिके, दुपारी ३.३० वाजता भूषण कापडणीस यांचा म्युझिकल तंबोला कार्यक्रम होणार आहे.

या प्रदर्शनात वस्त्र, खाद्य पदार्थ, खेळणी, बॅग, घरघुती उपकरणे, शोभेच्या वस्तू, ऑरगॅनिक उत्पादने, घाना तेल, ड्रायफ्रूट्स, संतुलित आहार, ब्रेन मॅपिंग अँन्ड हॅन्ड रायटींग अनॅलीसीस, बँकिँग, वैद्यकीय सेवा, वाहन, इन्शुरन्स, यासह विविध प्रकारचे स्टॉल आहेत. महिला उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे व या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन अनिलकुमार लोढा, सोनल दगडे व महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या