Sunday, April 27, 2025
Homeक्रीडा‘जागृती’ चौथ्याच वर्षी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी

‘जागृती’ चौथ्याच वर्षी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी

रोईंग क्रिडाप्रकारात मिळवले प्राविण्य

नाशिक । दिनेश सोनवणे 

- Advertisement -

नुकत्याच शिवछत्रपती पुरस्कारांंची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. यामध्ये नाशिकच्या सहा खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले. शहरातील केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी जागृती शहारे हिचाही या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षांत रोईंग क्रीडा प्रकारात नाविण्यपुर्ण कामगिरी केल्यामूळे तिला हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

जागृती मुळची नाशिकचीच. वडीलांचे छोटेखानी किरणा दुकान आहे. वडील व्यावसायिक असले तरी मुलांनी काहीतरी करुन दाखवावे असे ते नेहमीच म्हणायचे. वडीलांच्या प्रेरणेनेच खर्‍या अर्थाने रोईंगपटू बनल्याचे जागृती सांगते. तिला सुरुवातीपासूनच मैदानी खेळांची आवड होती.

यानंतर २०१६ मध्ये तिने रोईंग क्रिडाप्रकारात करीयर करण्याचे ठरविले. त्यानूसार तिने माजी महापौर प्रकाश मते यांच्या सुयोजित गार्डन परिसरातील बोटक्लबवर तिने धडे घ्यायला सुरुवात केली. याठिकाणी जागृतीला अंबादास तांबे यांनी मार्गदर्शन केले. जागृतीच्या डायटपासून ते तिच्या उत्तम कामगिरीपर्यंतची काळजी तांबे सरानी घेतली.

२०१६ मध्ये जागृतीने बर्‍याच ट्रायल दिल्या, यात तिची कामगिरी उत्तम असल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०१७ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून पुन्हा तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०१८ साली चेन्नमध्ये झालेल्या स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदक मिळवले. पुढे तिने ऑल इंडिया इंटर युविव्हर्सिटी, जागतिक विद्यापीठस्तरीय स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केली. जागृतीला पुढे ऑलिम्पिक, तसेच आशियाई स्पर्धांमध्येही चांगला खेळ करून पदक जिंकायचे आहे.

जागृती चपळ आहे. सराव करण्यासाठी तिने कधी आळस आणला नाही. दररोज मते बोटक्लब येथे सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने ती सरावाला येते. खेळात कष्ट करण्याची ज्याची तयारी असते त्याचा यशापासून कोणीही रोखू शकत नाही. तसेच जागृतीच्या बाबतीत झाले. तिने मेहनत घेतली तिला तिचे फळ मिळाले.
अंबादास तांबे, प्रशिक्षक

राष्ट्रीय स्तर
१. चॅलेंजर स्प्रिंट नॅशनल २०१८ (रौप्यपदक)
२.अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा २०१८ (कांस्यपदक)
३. तिसरी इनडोअर नॅशनल २०१९  – (सुवर्णपदक)

राज्यस्तर

१. ४३ वी राज्यस्तरीय रोईंग चॅम्पियनशिप २०१७ (सुवर्णपदक)
२. ४४ वी रोईंग चॅम्पियनशिप २०१८ (रौप्यपदक)
३. ४४ वी रोईंग चॅम्पियनशिप २०१८ (सुवर्णपदक)
४. ४४ वी रोईंग चॅम्पियनशिप २०१८ (सुवर्णपदक)
५. ४५ राज्यस्तरीय रोईंग चॅम्पियनशिप २०१९ (सुवर्णपदक)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : दोन महिलांना पिकअपची धडक, एक जागीच ठार तर...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एक भीषण अपघात घडला. दोन महिलांना भरधाव पिकअपने धडक दिली, ज्यात एक महिला जागीच ठार झाली, तर...