नाशिक। प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्रिकुटाने युवकास बेदम मारहाण करत चाकू हल्ल्ला केल्याचा प्रकार शनिवारी (दि.१६) दुपारी पंचवटीतील मेरी कॉलनी परिसरात घडला.
निलेश राऊत(रा. गौडवाडी, फुलेनगर, पंचवटी), राकेश, सनी पुर्ण नाव माहित नाहीत (रा. अवधुतवाडी, पंचवटी ) अशी मारहाण करणार्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश उत्तम गरूड (रा. तारवालानगर, दिंडोरी रोड) याने तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी दुपारी गरूड हा मेरी कॉलनी येथे उभा असताना तेथे संशयित आले व त्यांनी त्याकडे दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी केली. त्याने नकार देताच तिघांनी मिळून त्यास बेदम मारहाण केली. तसेच एकाने रिक्षातून चाकू काढून डोक्यात तसेच चेहर्यावर वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत.