Thursday, May 23, 2024
Homeनाशिकखून, लुटमार करणारे ४ तासात जेरबंद; ग्रामिण दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची...

खून, लुटमार करणारे ४ तासात जेरबंद; ग्रामिण दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यात खून करून लुटमार करणार्‍या टोळक्यास ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांनी इतर नागरीकांची लूट केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

शाहबाज अंजुम मेहमूद अहमद (२०, रा.गल्ली नं.४, हकिमनगर, मालेगाव), नुर अमीन नियाज अहमद उर्फ सोनु (२२, रा. हकिमनगर, मालेगाव) व मोहमद युसूफ मोहमद याकुब उर्फ युसूफ भ्ाुर्‍या(23, रा. पवारवाडी, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मालेगाव तालुक्यातील सायने बु॥ शिवारातील आर.आर.जाजु कंपाऊंड परिसरात शनिवारी (दि.७)रात्री आठ वाजेच्या सुारास एका राखाडी रंगाचे युनिकॉर्न मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात तीघांनी येथील गोरख नामदेव जाधव (५०, रा.गिगाव, ता.मालेगाव) यांचा मोबाईल हिसकावला होता. त्यांनी विरोध करताच त्यांंच्या छातीवर चाकुने वार करून पळुन गेले होते. तसेच नागरीकांनाही चाकुचा धाक दाखवुन मारहान करून त्यांचे मोबाईल व रोख रक्कम जबरीने लुटमार केली होती. या घटनेतील जखमी गोरख जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानुसार मालेगाव पोलीस ठाण्यात जबरी लूटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचा समांतर तपास सुरू केला होता.

मालेगावातील काही सराईत गुन्हेगारांकडे सध्या विना नंबरची युनिकॉर्न गाडी असुन गुन्ह्यात वर्णन केल्या प्रमाणे ते असल्याचे व ते हकिमनगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून स्थागुशाचे पथकाने हकिमनगर परिसरात महाराटं लाईट हाउस समोर सापळा रचुन सराईतांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी जाधव यांची लूट करून चाकू मारल्याची तसेच इतर तिघांची लूट केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडुन अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची ाक्यता आहे.

जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदिप घ्ाुगे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक निरिक्षक संदिप दुनगहू, सुनिल आहिरे, पोहवा सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतिलाल वाघ, संदिप लगड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, दत्ता माळी यांचे पथकाने ही कामगिरी केली. अवघ्या चार तासात सराईत पकडल्याने अधिकक्षक डॉ. सिंह यांनी पथकाचे कौतुक केले.

11 मोबाईल जप्त
संशयितांच्याकब्जातुन रेडमी कंपनीचे ५ मोबाईल, व्हीवो, लिनोव्हो, पॅनासोनिक, आयटेल व जिओ कंपनीचे ६ मोबाईल असे एकुण ११ मोबाईल हॅण्डसेट, गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल व रोख रक्कम असा एकुण ९४ हजार ५९० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या