Friday, May 24, 2024
Homeनाशिककरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ‘कणकोरी’ सील; तपासणी मोहीम सुरु

करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ‘कणकोरी’ सील; तपासणी मोहीम सुरु

नांदुरशिंगोटे -। वार्ताहर

कणकोरी येथे काल ३८ वर्षीय करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे .याच दरम्यान गावठाण परिसरात मुंबईहून आलेल्या एकाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने कनकोरी गावात खळबळ उडाली आहे दरम्यान सदर तरुणास सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

- Advertisement -

नांदूर शिंगोटे -मानोरी कणकोरी या गावात करोनाची दहशत कायम असून नांदूर शिंगोटे हाय रिस्क झोन तर रुग्ण राहत असलेल्या आरखडी चारी नंबर दोन चा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे आरोग्य विभागाच्या वतीने कणकोरी गावात आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे तर नांदुर-शिंगोटे येथे जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे पोलिसांनी नांदुर-शिंगोटे गावच्या सर्व सीमा बंद केल्याने तसेच गावात गस्त वाढविल्याने सर्वत्र शांतता भासत आहे करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना तपासणीसाठी प्रवृत्त केले जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे

याच दरम्यान कणकोरी येथे सकाळी आरोग्य पथकामार्फत घराघरात आरोग्य तपासणी सुरू असताना याच गावातील गावठाण परिसरात मुंबईहून आलेल्या एकाला कोरोना ची लक्षणे आढळल्याने त्यास तातडीने सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने कोरणा लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य तपासणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नांदुर-शिंगोटे व दोडी बुद्रुक येथील कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे .

जिल्हा व जिल्हा बाहेरून शेकडो शेतकरी कांदा विक्रीस आणतात मात्र कांदा लिलाव बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे तहसीलदार राहुल कोताडे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन मस्के आरोग्य सेवक ए बी गांगुर्डे आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या